बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी 1 जुलै हा काळा दिवस ठरला. सलग दोन वेळचा चॅम्पियन असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत क्वालिफाय होता आले नाही. संघाला स्कॉटलंड संघाकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ते विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत. त्यांना विश्वचषकाच्या क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वे आणि नेदरलँडसारख्या संघानीही पराभवाचा धक्का दिला होता. अशात वनडे विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा वेस्ट इंडिज संघ स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. एकीकडे डॅरेन सॅमी, मायकल होल्डिंग यांसारखे माजी खेळाडू संघाच्या पराभवाने दुखी आहेत, पण दुसरीकडे ख्रिस गेल मात्र पार्टी करताना दिसत आहे.
आलिशान लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेल (Chris Gayle) याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गेल पार्टीच्या मूडमध्ये दिसत आहे. तो या व्हिडिओत सिगारेट ओढताना दिसत आहे. तसेच, त्याच्या मागे उभी असलेली सुंदर मुलगी त्याला बॉडी मसाज देत आहे. गेलने हा व्हिडिओत आपला संघ वनडे विश्वचषक 2023मधून बाहेर पडल्यानंतर शेअर केल्याचे बोलले जात आहे.
https://www.instagram.com/reel/CuKf_8eI6Lh/
या व्हिडिओला 16 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि 1 हजारांहून अधिक कमेंट्सचा वर्षाव पडला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने “पीटर” असे लिहीत हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत. तसेच, एका चाहत्याने लिहिले की, “वेस्ट इंडिज हारल्याचा आनंद साजरा करतोय भाऊ.” दुसऱ्या एकाने हिंदीमध्ये कमेंट करत लिहिले की, “आग लगे चाहे बस्ती में, बाबा तो रेहता है मस्ती में.”
निवृत्तीवर सोडले मौन
ख्रिस गेल 43 वर्षांचा असून त्याने निवृत्तीविषयी मौन सोडत म्हटले होते की, “मी अजून निवृत्ती घेण्याविषयी विचार केला नाहीये. लोकांना मला अजूनही खेळताना पाहायचे आहे. मी मैदानावर उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”
वेस्ट इंडिजकडून अखेरचा वनडे सामना 2019च्या वनडे विश्वचषकादरम्यान खेळला होता. त्यानंतर 2021मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. यादरम्यान तो वेगवेगळ्या टी20 लीगमध्येही खेळताना दिसतो. मात्र, आयपीएलमध्ये त्यावर कुणीही बोली लावली नाही. गेलला लिलावात अनसोल्ड राहिल्याचे दु:खही झाले होते. (universe boss chris gayle enjoying vacations west indies out of cricket world cup)
महत्वाच्या बातम्या-
Ashes । कठीण स्थितीत कॅप्टन स्टोक्सचं वादळी शतक! इंग्लंड विजयापासून 128 धावा दूर
‘मी जर भारताकडून खेळलो असतो, तर 1000 विकेट्स…’, पाकिस्तानी गोलंदाजाचे खळबळजनक विधान