वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. तो म्हणाला की, त्याला या गोष्टीवर विश्वास करण्याची संधी मिळाली नाही की, विराट त्याच्या खराब फॉर्ममधून बाहेर येत विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा अव्वल फलंदाज बनणार नाही. खरं तर, गेल आणि विराट हे दोघेही आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळले आहेत.
दबावात असेल भारत
‘युनिव्हर्स बॉस’ नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल (Chris Gayle) याने विराट कोहली (Virat Kohli) याला मानसिक आणि शारीरिकरीत्या मजबूत क्रिकेटपटू म्हटले. तसेच, तो असेही म्हणाला की, भारतात होणाऱ्या विश्वचषकात विराटचा दबदबा राहील. तो म्हणाला, “फक्त विराटच नाही, तर प्रत्येक खेळाडू अशा काळातून जातो. कठीण काळ जास्त काळ टिकत नाही. मात्र, मजबूत खेळाडू दीर्घ काळ टिकतात. विराट मानसिक आणि शारीरिकरीत्या मजबूत आहे. तो विश्वचषकात तीच लय कायम ठेवून वर्चस्व गाजवेल.”
यादरम्यान गेलने असेही म्हटले की, भारत दबावात असेल. कारण, ते वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup) स्पर्धेत घरच्या मैदानांवर प्रबळ दावेदार म्हणून उतरतील.
आयसीसी ट्रॉफी न जिंकणे मोठे नुकसान
गेलने भारताच्या आयसीसी ट्रॉफी न जिंकण्यावर भाष्य केले. तो म्हणाला की, “मला माहिती आहे की, भारताने दीर्घ काळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. आमच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. आम्ही शेवटचे 2016मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकलो होतो. अशात भारतीय संघ दबावात असेल. कारण, यावेळी ते त्यांच्याच देशात आयसीसी स्पर्धा खेळणार आहेत.”
भारताने 2013मध्ये जिंकलेली आयसीसी ट्रॉफी
भारतीय संघाने 2011मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने धोनीच्याच नेतृत्वाखाली 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारत 2014मध्ये टी20 विश्वचषक, 2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021 आणि 2023मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, या चारही मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात संघ पराभूत झाला होता.
भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना खेळला जाईल. (universe boss chris gayle lauds at cricketer virat kohli for upcoming odi world cup)
महत्वाच्या बातम्या-
‘अरे भावा, कुठल्या लाईनमध्ये घुसलास तू?’, रहाणेच्या लेटेस्ट व्हिडिओवर चाहत्याची कमेंट, पत्नीही म्हणाली…
रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवल्याने गांगुली हैराण! माजी कर्णधारचे मोठे विधान