यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सोमवारी संजना गणेशनबरोबर लग्न केले. पेशाने अँकर असलेल्या संजनाने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या जसप्रीत बुमराहला मात्र क्लिन बोल्ड केले आहे. गोव्यात या दोघांनी लग्न केले असून दोघांनीही याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. याबरोबर सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जेव्हा जेव्हा क्रिकेटचा सामना सुरु असतो, तेव्हा जसप्रीत बुमराह स्वत:ला सामन्यात पुर्णपणे झोकून देतो. बऱ्याच वेळा तो कॅमेऱ्यापासून दुरही असतो. असे असताना हा गोलंदाज प्रेमाच्या खेळपट्टीवर कधीपासून गोलंदाजी करत होता, याचा थांगपत्ताही चाहत्यांना लागला नाही.
संजना एक अँकर आहे व तिला आयपीएल दरम्यान अनेक वेळा बुमराहला प्रश्न विचारताना चाहत्यांनी पाहिले आहे. संजना एक हुशार अँकर म्हणून ओळखली जाते. ती अभ्यासातही टॉपर राहिली आहे. तसेच ती एक हजरजबावी व्यक्ती आहे.
On ground for #SAvsIND, with @sanjaymanjrekar and @GraemeSmith49! @cricketworldcup @StarSportsIndia @ICC #CWC19 pic.twitter.com/rSFT3G9RCK
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) June 5, 2019
संजनाने पुण्यातून शिक्षण घेतले आहे. तिने इंजीनिअरिंग केले असून पुण्यातील सिंबायोसिस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये ती शिकली आहे. तिचे वडिल हे ‘अलाना इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ या संस्थेत डायरेक्टर म्हणून काम पाहतात.
संजनाने रिऍलिटी शो रोडीजमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावलं होतं. २०१४ साली ती मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. तिने २०१३ साली फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार देखील जिंकला होता.
World Cup ready! #CWC2019 pic.twitter.com/21eszmQXnB
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) May 28, 2019
जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेटपटूंमध्ये एक फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तशीच त्याची पत्नी संजनाही एक फिट व्यक्तीमत्त्व आहे. तिला अनेक वेळा योगा करताना व जीममध्ये घाम गाळताना पाहिले आहे.
workout to stay healthy, ghee your paranthas to stay sane. 🥞
.
.#ItIsAllAboutBalance #StayHome #StaySafe #StaySane pic.twitter.com/kq9wVGXq6n— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 27, 2020
संजनाला फिरण्याची मोठी हौस असून खासकरुन ती समुद्रकिनारी वेळ घालविण्यास प्राधान्य देते. याच कारणामुळे त्यांचे लग्न गोव्यात झाल्याचे बोलले जातेय.
woke up missing the beach. 🌊#throwback pic.twitter.com/wrKUNnhX08
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) November 29, 2020
ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतो. तसेच ती या माध्यमांचा खुबीने वापर करते. क्रिकेट सोडून संजनाने फूटबॉल व बॅडमिंटन खेळांच्या शोमध्ये देखील होस्ट म्हणून काम पाहिले आहे.
First night in Hyderabad! 🏸 @PBLIndiaLive pic.twitter.com/bE04vNSgfr
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) January 29, 2020
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल लिलावात पैसे जास्त मिळाले म्हणून चेंडू जास्त स्विंग होत नाही किंवा खेळपट्टीवर गवतही येत नाही
राजकारणापासून समाजसेवेपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी