भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. नुकताच त्याने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर्स संघाकडून खेळताना एक नकोसा असा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्याने सरे विरुद्ध खेळताना पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 70 मिनिटे घेतली. तसेच 41 डॉट बॉल घतले. याआधीही याचवर्षी जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या सामन्यातही त्याने पहिली धाव घेण्यासाठी 79 मिनिटे घेतली होती.
त्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिली धाव घेण्यासाठी दोन वेळा 70 किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटे घेणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. 246 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.
याआधी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये माजी गोलंदाज सुनिल जोशी 2005-06 च्या दरम्यान बडोदा विरुद्ध बंगाल सामन्यात 100 चेंडू आणि 120 मिनिटे मैदानात घालवत शुन्यावर नाबाद राहिले होते.
तसेच भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने एकदा हरियाणा विरुद्ध विदर्भ सामन्यात 79 मिनिटे मैदानात घालवली होती. पण अखेर 77 वा चेंडू खेळताना तो शुन्यावर त्रिफळाचित झाला.
पुजाराची मागील काही सामन्यांपासुन खराब कामगिरी होत आहे. त्याने मागील 5 कौंटी सामन्यात मिळून फक्त 13.20 च्या सरासरीने 132 धावा केल्या आहेत. तसेच यात तो दोनवेळा सलग शुन्यावर बाद झाला आहे.
त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघासाठी त्याची ही कामगिरी चिंता वाढवणारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–४ सामन्यात ३ शतके करणारा खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार
–टॉप ५: ज्याचा विचारही केला नसेल असे ५ विक्रम टीम इंडिया आज करणार
–त्या महान खेळाडूने क्रिकेटमध्ये मिळालेल्या ट्राॅफी मित्रांमध्ये वाटल्या