प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेला प्रो कबड्डीचा ११७ वा सामना दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. यूपी योद्धांनी ४४-२८ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
???? and ???? and ????@UpYoddha 'played it cool' against the Dabang army and sealed the third spot in the points table ????#DELvUP #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/RQs1HnH47O
— ProKabaddi (@ProKabaddi) February 14, 2022
????FULL TIME????
And Pardeep Narwal does it again!!! ????????
UP Yoddha inch closer to confirming their place in the playoffs.????#Kabaddi #ProKabaddiLeague #VIVOProKabaddiLeague #VivoProKabaddi #PKL #PKL8 pic.twitter.com/VnZcShvkih
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 14, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा ११६ वा सामना पटणा पायरेट्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पटणा पायरेट्सने ३८-३० च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील १४ वा विजय होता.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १९ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १४ सामने जिंकत ७५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६० गुण) आणि यूपी योद्धा (५८ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टेबल टॉपर’ पटणा पायरेट्सचा आणखी एक विजय, तेलुगू टायटन्सला ३८-३० ने केले चितपट
आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी
“मेगा लिलावातून मिस्टर आयपीएल मिस…”, सुरेश रैनाच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली नाराजी






