मंगळवार रोजी (०२ नोव्हेंबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ ला उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ मिळाला आहे. या दिवशी विश्वचषकातील अनुक्रमे ३० आणि ३१ वा सामना झाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दिवसातील पहिली लढत रंगली. दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने हा सामना जिंकत बांगलादेशचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आणला. त्यानंतर पाकिस्तान आणि नामिबिया संघांमध्ये दुसरा सामना झाला. पाकिस्तान संघाने त्यांचा विजयरथ सुरू ठेवत ४५ धावांनी सामन्यात बाजी मारली आणि उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवला.
या २ सामन्यांनंतर गुणतालिकेतील कोणत्याही संघाच्या स्थानामध्ये फेरबदल झाला नाही. मात्र त्यांच्या गुण आणि नेट रनरेटमध्ये मात्र मोठा फरक जाणवला आहे.
गट १ मधील दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर विजयी झालेला दक्षिण आफ्रिका संघाच्या खात्यात २ गुणांची भर पडली आहे. एकूण ३ विजयांसह ६ गुणांची कमाई करत हा संघ दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच त्यांचा नेट रन रेटही ०.७४२ झाला आहे. तर सलग चौथ्या पराभवासह बांगलादेशचा संघ गुणातालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे. या पराभवासह त्यांचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
तर गट १ मध्ये इंग्लंड संघ सर्वाधिक ४ विजयांसह अव्वलस्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ २ विजयांसह दक्षिण आफ्रिकेनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे अजून २ सामने बाकी असल्याने हा संघ दक्षिण आफ्रिकेला टक्कर देताना दिसू शकतो. परंतु जर दक्षिण आफ्रिकेने पुढील इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. यानंतर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज २ गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. यातील वेस्ट इंडिज संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवासही जवळपास संपला आहे.
गट २ च्या गुणतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तान संघ सलग चौथ्या विजयासह ८ गुणांची कमाई करत अव्वलस्थानी कायम आहे. यासह त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दारही उघडे झाले आहे. पाकिस्तानव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. अफनाणिस्तान संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड आणि नामिबियाचे गुण (४ गुण) समान आहेत. परंतु नेट रन रेटमध्ये न्यूझीलंड संघ पुढे असल्याने ते तिसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर भारत पाचव्या व स्कॉटलँड सहाव्या स्थानी आहे. या संघांसाठी उपांत्य फेरीची समीकरणे अजूनच कठीण बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान ऑन टॉप! टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिकवेळा सेमीफायनल गाठण्यात आझमचा संघ अव्वल






