---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूंच्या ‘खिलाडूवृत्ती’ची द्यावी लागेल दाद! नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन केलं असं काही

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 10:01 AM
---Advertisement---

मंगळवारी (२ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात बलाढ्य पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या नामिबिया संघावर ४५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना झाल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडूंनी नामिबिया संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी नामिबिया संघाचे ड्रेसिंग रूम गाठले होते. ज्याचा व्हिडिओ पाकिस्तान संघाच्या आधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकसह शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, फखर जमान आणि संघातील इतर खेळाडू नामिबिया संघातील खेळाडूंचे कौतुक करताना दिसून येत आहेत.

त्यावेळी नामिबिया संघातील खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीसोबत फोटो क्लिक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघ ग्रूप २ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारत, अफगानिस्तान, न्यूझीलंड , नामिबिया आणि स्कॉटलॅंड संघ आहेत. आतापर्यंत पाकिस्तान संघाने ४ संघांना पराभूत करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पाकिस्तान संघाचा पुढील सामना स्कॉटलॅंड संघासोबत होणार आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघाला सुरुवातीच्या २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २ बाद १८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नामिबिया संघाला ५ बाद १४४ धावा करण्यात यश आले. हा सामना पाकिस्तान संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जितने की आदत हो गयी है’, पाकिस्तानच्या विजयी ‘चौकारा’नंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर

विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!

जे भारतालाही नाही जमलं, ते पाकिस्ताननं केलं; ‘इतक्या’ वेळेस गाठली टी२० विश्वचषकाची सेमीफायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---