---Advertisement---

जीटीविरुद्ध फिफ्टी करताच कर्णधार ऋतुराजच्या नावावर आयपीएल 2026चा नकोसा विक्रम! सीएसकेने केल्या 158 धावा

On: रविवार, एप्रिल 26, 2026 5:50 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आजचा (२६ एप्रिल) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. यामध्ये सीएसकेने खराब सुरुवातीनंतर पुनरागमन करत १५८ धावा केल्या. त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ७४ धावा केल्या असल्या तरी, त्याने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. आयपीएल २०२६ मधील सर्वात संथ अर्धशतकाचा विक्रम ऋतुराजच्या नावावर आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ४९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

चेपॉकवर सुरू असलेल्या या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. त्यांनी तिसऱ्या षटकानंतर एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी धुमाकूळ घालत पुढच्या सात चेंडूंमध्ये संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान यांना बाद केले. डेवाल्ड ब्रेविसही ९ चेंडूत २ धावा करत तंबूत परतला. त्यामुळे ८.२ षटकानंतर सीएसकेने चार विकेट्स गमावत ३७ धावा केल्या.

ऋतुराज ३६ चेंडूंमध्ये २० धावा करून क्रीजवर होता. मात्र, त्याने पुढच्या १३ चेंडूंमध्ये ३० धावा करून ४९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२६ मधील हे आतापर्यंतचे सर्वात संथ अर्धशतक आहे. तसेच, ‘इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट’ नियम लागू झाल्यापासून इंडियन प्रीमियर लीगमधील हे सर्वात संथ अर्धशतक आहे. तसेच सीएसकेकडून हे आयपीएलच्या इतिहासातील सहावे संथ अर्धशतक ठरले आहे. तसेच ऋतुराजने सीएसकेसाठी १०० षटकार मारण्याचा विक्रमही रचला आहे.

आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सर्वात संथ अर्धशतके –
५३ चेंडू – पार्थिव पटेल विरुद्ध पीबीकेएस, चेन्नई २०१०
५१ चेंडू – मॅथ्यूू हेडन विरुद्ध एमआय, गकेबेर्हा २००९
५० चेंडू – मुरली विजय विरुद्ध पीबीकेएस, मोहाली २०१३
४९ चेंडू – मुरली विजय विरुद्ध आरआर, जयपूर २०१३
४९ चेंडू – डी स्मिथ विरुद्ध एमआय, वानखेडे २०१४
४९ चेंडू – ऋतुराज गायकवाड विरुद्ध जीटी, चेन्नई २०२६

जीटीविरुद्ध १४ षटकानंतर सीएसकेने ४ विकेट्स गमावत ७५ धावा केल्या होत्या. यामुळे सीएसके१२० धावसंख्या तरी उभारेल का ही चिंता असताना ऋतुराजने धावा करण्यात वेग पकडला. त्याने शिमव दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी ४३ चेंडूत ५९ धावांची भागीदारी केली. दुबे २२ धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋतुराजने जेमी ओव्हर्टन आणि कार्तिक शर्मासोबत छोट्या-छोट्या भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. १९ व्या षटकात २१ धावा आणि २० व्या षटकात १५ धावा करत सीएसकेने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---