अमेरिकन दूतावासानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेचा व्हिजा अर्ज फेटाळला आहे. संदीपनं स्वत: बुधवारी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. त्यानं अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी व्हिजाचा अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. ज्यामुळे तो आता विश्वचषकात खेळू शकणार नाही. नेपाळची क्रिकेट टीम या स्पर्धेसाठी आधीच अमेरिकेला रवाना झाली आहे.
23 वर्षीय लेग स्पिनर संदीप लामिछाने याला या वर्षी जानेवारी महिन्यात बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 15 मे रोजी त्याला कोर्टानं क्लीन चिट दिली. त्यानंतर त्याचा नेपाळच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला होता. संदीप लामिछानेनं शेवटचा सामना आतंरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ओमानविरुद्ध खेळला होता.
संदीप लामिछाने नेपाळमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला ऑक्टोबर 2022 मध्ये 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. संदीपवर त्या वर्षी ऑगस्टमध्ये काठमांडूतील हॉटेलमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. खटल्याची सुनावणी झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. हा खटला बराच काळ चालला. 10 जानेवारी 2024 रोजी लामिछानेला 3 लाख रुपयांच्या दंडासह 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रुणाल पांड्यामुळे जवळपास संपलं होतं आरसीबीच्या स्वप्निल सिंगचं करिअर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या
एलिमिनेटर सामन्यापूर्वी विजय माल्ल्यांचं आरसीबीसाठी खास ट्वीट, विराट कोहलीचं नाव घेऊन म्हणाले…