यूएस ओपन २०२१ स्पर्धेमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल मागे आहे. यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात विजय मिळवून जोकोविचने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने उपांत्य सामन्यात त्याने जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव याला मात दिली आणि अंतिम सामन्यात त्याचे स्थान पक्के केले. त्यामुळे आता १२ सप्टेंबरला अंतिम सामन्यात जोकोविच विरुद्ध रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्यातील टक्कर पाहायला मिळणार आहे.
उपांत्य सामन्यात झ्वेरेवने जोकोविचला चांगले आव्हान दिले. ५ व्या सेटपर्यंत गेलेल्या या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ६-४ ने हरवले होते आणि सामन्यात आघाडी घेतली होती. त्यानंतर जोकोविचने अप्रतिम पुनरागमन करत पुढच्या दोन सेटमध्ये अनुक्रमे ६-२ आणि ६-४ आशा फरकाने विजय मिळवला आणि सामन्यात आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये झ्वेरेव पुन्हा जोकोविचपेक्षा सरस ठरला आणि त्याला ६-४ ने हरवले. त्यामुळे ५ व्या सेटमध्ये सामना गेला. शेवटच्या सेटमध्ये जोकोविचने ६-२ ने विजय मिळवत स्पष्ट केले की तो टोनिसमधील एक महान खेळाडू आहे.
झ्वेरेवने नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोविचला मात दिली होती. या पराजयामुळे जोकोविचचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले.
आता जोकोविचकडे कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी चांगली संधी आहे. कॅलेंडर ग्रँडस्लॅम म्हणजे एकाच वर्षात टेनिसच्या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे होय. जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता तो युएस ओपन स्पर्धा जिंकून कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करु शकतो.
नदाल आणि फेडरर यांना मागे सोडण्याची संधी
जोकोविचकडे यूएस ओपन जिंकून केवळ कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचीच नाही, तर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना मागे सोडण्याची संधी आहे. या तिन्ही खेळाडूंनी आता पर्यंत प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्यामुळे पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत तिघेही संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. पण जर जोकोविचने यूएस ओपन जिंकले, तर तो नदाल आणि फेडरर या दोघांना मागे सोडत पहिल्या स्थानावर पोहचेल.
जोकोविचने सांगितले आहे की तो यूएस ओपन जिंकण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही. तो म्हणाला, “मी माझ्या पुढच्या सामन्याला शेवटच्या सामन्यासारखे खेळेणार आहे. मी खूप उत्साहित आहे आणि सामना जिंकण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला टी२० विश्वचषकात खेळवण्याचा शब्द दिला होता, आता संपर्कही साधला नाही’, ताहिरचा आरोप
भारत-इंग्लंड संघामधील कसोटी सामना पुन्हा कधी खेळवला जाऊ शकतो? वाचा सविस्तर