आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) दिग्गज धावपटू उसेन बोल्टला आगामी टी20 विश्वचषकासाठी ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. टी20 विश्वचषक 1 ते 29 जून 2024 दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे.
आठ वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन उसेन बोल्टनं 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानं 2008 बीजिंग ऑलिम्पिक, 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिम्पिक, अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे.
उसेन बोल्ट टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर म्हणून स्पर्धेचा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. तो वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक सामन्यांना उपस्थित राहणार आहे. तसेच युनायटेड स्टेट्समध्ये खेळाचा प्रचार करणाऱ्या चाहत्यांच्या कार्यक्रामातही तो सहभाग नोंदवेल.
उसेन बोल्टच्या नावावर सध्या 100 मीटरमध्ये 9.58 सेकंद, 200 मीटरमध्ये 19.19 सेकंद आणि 4×100 मीटरमध्ये 36.64 सेकंदांचा जागतिक विक्रम आहे. बोल्टनं त्याचा पहिला विश्वविक्रम 2008 मध्ये 100 मीटरमध्ये नोंदवला होता, जेव्हा त्यानं न्यूयॉर्कमध्ये 9.72 सेकंद वेळ नोंदवली होती. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक गेम्समध्ये त्यानं ते अंतर 9.69 सेकंदात कापलं. तर बर्लिनमधील 2009 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं 9.58 सेकंदांचा विश्वविक्रम रचला.
उसेन बोल्टनं त्याच्या नवीन भूमिकेबद्दल उत्साह व्यक्त करताना म्हटलं, “आगामी टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर बनल्यानं मी रोमांचित आहे. क्रिकेट हा आमच्या जीवनाचा एक भाग असून कॅरिबियन देशात या खेळाला नेहमीच विशेष स्थान मिळालं आहे. मी अर्थातच विश्वचषकात वेस्ट इंडिजला पाठिंबा देईन, पण अमेरिकेत खेळाला प्रवेश मिळणं हे क्रिकेटसाठी मोठं आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी खेळाची बाजारपेठ आहे आणि टी-20 विश्वचषकासाठी आम्ही जी ऊर्जा आणणार आहोत ती 2028 मधील लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये झालेल्या क्रिकेटच्या समावेशासाठी मोठी संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर
आयपीएल 2024 मध्ये कांगारू फलंदाज तुफान फार्मात! टी20 विश्वचषकासाठी सर्व संघांना धोक्याची घंटा!
व्वा! काय दृश्य आहे… आयपीएलच्या स्टेडियममध्ये बसून चाहता मोबाईलवर पाहतोय पाकिस्तान-न्यूझीलंड सामना!