सिडनी। ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील ऍशेस २०२१-२२ मालिकमधील चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाला. या सामन्यातून जवळपास अडीच वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केलेल्या उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. याबरोबरच त्याच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला आहे.
उस्मान ख्वाजा हा मुळचा पाकिस्तानी आहे. त्याचा जन्म पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील असून तो लहानपणीच त्याच्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला. पण आशियाई मूळ असल्याने आज त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या आशिया खंडात जन्मलेल्या खेळाडूंच्या यादीत ख्वाजा अव्वल स्थानी आला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला या यादीत मागे टाकले आहे.
ख्वाजाने ऑस्ट्रेलियात ८ कसोटी शतके केली आहेत. तसेच सचिन आणि विराटच्या नावावर प्रत्येकी ६ कसोटी शतके आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ५ शतकांसह सुनील गावसकर आहेत, तर चौथ्या क्रमांकावर प्रत्येकी ४ शतकांसह कॉलिन कॉड्रे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आहे.
सिडनी कसोटीत उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) दुसऱ्या डावात १३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकर मारले. त्याने ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात देखील ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या शतकांमुळे ऑस्ट्रेलिया या कसोटीत इंग्लंड संघाला वरचढ ठरत आहे.
अधिक वाचा – ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी
ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
सध्या सुरू असलेल्या ७२ व्या ऍशेस मालिकेतील (Ashes Test Series) चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील १२२ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर ३८८ धावांचे आव्हान ठेवले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता, तर इंग्लंडचा पहिला डाव २९४ धावांवर संपुष्टात आला होता.
चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने ११ षटकात बिनबाद ३० धावा केल्या आहेत. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी तब्बल ३५८ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! आता तिसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या उपस्थितीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह
विराटचे केपटाऊन कसोटीत खेळणे जवळपास पक्केच, पण मग संघाबाहेर होणार कोण? ‘हे’ आहेत ४ पर्याय
व्हिडिओ पाहा – डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत