भारतात सध्या आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. ही स्पर्धा कोरोना महामारीतही विना प्रेक्षक खेळवली जातेय. खेळाडू, संघमालक व चाहत्यांसोबत खेळाडूंचे कुटुंबीय देखील या स्पर्धेसाठी उत्साहित असल्याचे दिसत आहेत. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा याच्या मुलाचे चेन्नईची जर्सी घातलेले छायाचित्र चांगलेच व्हायरल होत आहे.
प्रथमच चेन्नईसाठी खेळत आहे उथप्पा
अनुभवी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. संघाने खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नाही. राजस्थान रॉयल्सविरूद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला संघात सामील केले जाऊ शकते. विशेष म्हणजे उथप्पा मागील वर्षी राजस्थान संघाचा भाग होता. आयपीएल लिलावाआधी त्याला चेन्नईने ट्रेड करून आपल्या संघात सामील करून घेतले होते.
उथप्पाच्या मुलाचे छायाचित्र होतेय व्हायरल
रॉबिन उथप्पाचा मुलगा नील नोलन याचे चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घातलेले छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतेय. चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर खात्यावरून शेअर केलेल्या या छायाचित्राला ‘छोटा छावा तयार आहे’ असे कॅप्शन दिले गेलेले आहे.
Junior Cub Nolan 🔥 ku #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/xAbrLHz3cb
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 18, 2021
यासह स्वत: उथप्पाने देखील आपल्या लाडक्या मुलाचे छायाचित्र इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले दिसून येतो. या छायाचित्रावर उथप्पा आणि चेन्नई चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
https://www.instagram.com/p/CNzgX-FhsTZ/?igshid=u2k9mf5x7v0
The Jr 🦁 or should I say the CSK Cub is already getting ready to represent the lions in the future. 😍💛
Who better to learn from than his own dad, the most versatile batsman who wears the yellow jersey. Do well young one, greatness awaits you! 🥰🔥
— Aditya Singh Rawat (@Catslayer_999) April 18, 2021
चेन्नई खेळणार राजस्थानविरुद्ध
आयपीएल २०२१ च्या बाराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. चेन्नई गुणतालिकेत चौथ्या तर राजस्थान पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या जागी उथप्पाला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात निवडले जाऊ शकते.