उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी रविवारी रिषभ पंत याला भेटण्यासाठी डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात पोहोचले. शुक्रवारी (30 डिसेंबर) रिषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी रुरकीला जात असताना हा अपघात झाला, ज्यामध्ये पंतला गंभीर दुखापत झाली. भारताच्या या यष्टीरक्षक फंलंदाजाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात गेले आणि त्यांनी पंतच्या फिटनेसची चौकशी देखील केली.
मॅक्स रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami ) यांनी पंतच्या पिटनेसविषयी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात रस्त्यातील खड्यांमुळे झाला. पंतला भेटून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “कार अपघातात झालेल्या दुखापतीमुळे पंतच्या शरीरात वेदना होत आहेत. डॉक्टर असे म्हटले आहेत की, पुढच्या 24 तासांमध्ये या वेदाना कमी होतील. अपघातानंतर अनेक लोकांनी पंतची मदत केली. मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू राहतील.”
अपघातात पंतच्या पाठीला, गुडघ्यांना, पायाला आणि डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आले. पंतचे जखमी अपस्थेतील काही फोटो आणि व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल झाले होते. असे असले तरी, मागच्या दोन दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीत चांगली सुधारणा पाहायला मिळाली आहे. धामी पुढे बोलताना म्हणाले की, “मागच्या दोन दिवसात खूप सुधारणा झाली आहे. डॉक्टर्स आणि बीसीसीआय अधिकारी संपर्कात आहेत. त्याच्या आईशीही माझं बोलण झालं आहे. ते सर्वजण पंतवर सुरू असलेल्या उपचारांमुळे समाधानी आहेत. तो लवकर बरा होईल, अशी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत.”
दरम्यान, शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पंत आईला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीहून रुरकीला रवाना झाला. मात्र, वाटेत हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली. सुदैवाने गाडी पेट घेण्यापूर्वी पंत त्यातून बाहेर पडला होता. पंतला झालेली दुखापत गंभीर असून यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला 6 ते 9 महिन्यांचा वेळ लागू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार त्याच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटले आहे आणि आगामी आयपीएल हंगामातून त्याला माघार घ्यावी लागू शकते. (Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami gave detailed information about Rishabh Pant’s accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय
बीसीसीआयची मोठी घोषणा! दुखापतीतून सावरलेल्या वरिष्ठ खेळाडूंना म्हणतायेत, ‘तुम्ही आयपीएल 2023…’