भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका(India vs south africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. नुकताच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत रिषभ पंतला (Rishabh pant) विश्रांती देण्यात आली होती. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो पुनरागमन करणार आहे. दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे.
नुकताच रिषभ पंतला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी(Pushkar Singh Dhami) यांनी व्हिडिओ कॉल केला होता. ज्यावर त्यांनी रिषभ पंत सोबत संवाद साधला आणि त्याला उत्तराखंड राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी दिली (Pushkar Singh Dhami Rishabh Pant video call). रिषभ पंत हा भारतीय संघातील स्टार युवा खेळाडू आहे. त्याचा जन्म हरिद्वारमध्ये झाला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते रिषभ पंत सोबत बोलताना दिसून येत आहेत.
त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देखील दिले. ज्यावर लिहिले आहे की, “भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक, युवा खेळाडूंचा आदर्श, उत्तराखंडचा मुलगा रिषभ पंतची उत्तराखंड सरकारने राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आमचा या निर्णयामागचा उद्देश राज्यातील तरुणांना खेळ आणि आरोग्याबाबत जागरुक व्हावे हा आहे.”
भारत के बेहतरीन क्रिकेट खिलाडियों में से एक, युवाओं के आदर्श और उत्तराखण्ड के लाल श्री ऋषभ पंत जी को हमारी सरकार ने राज्य के युवाओं को खेलकूद एवं जन- स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित करने के उद्देश्य से "राज्य ब्रांड एंबेसडर" नियुक्त किया है। @RishabhPant17 pic.twitter.com/7vVyoXUmwP
— Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) December 19, 2021
रिषभ पंतची कारकीर्द
रिषभ पंतने अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, आतापर्यंत एकूण २५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण १५४९ धावा केल्या आहेत. तर १८ वनडे सामन्यात त्याने ५२९ आणि ४१ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६२३ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. येत्या काही दिवसात तो दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध कसोटी सामना खेळताना दिसून येईल.
महत्वाच्या बातम्या :
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क
‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन