मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत उत्तराखंडच्या बिगरमानांकीत माहिका खन्ना हिने दिल्लीच्या अव्वल मानांकित समीक्षा दबसचा टायब्रेकमध्ये 7-6(7), 6-4 असा सनसनाटी पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आस्मि आडकर व ऐश्वर्या जाधव यांनी अनुक्रमे गुजरातच्या क्रीशा दलाल व दिल्लीच्या वामिका शर्माचा 6-1, 6-2 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. तेलंगणाच्या पाचव्या मानांकित थानिया गोगुलामंडाने ओरिसाच्या आराध्या वर्माचा 3-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. पश्चिम बंगालच्या साईजयानी बॅनर्जी हिने महाराष्ट्राच्या अवनी चितळेवर 6-4, 6-3 असा विजय मिळवला.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या समर्थ सहिता, अर्णव पापरकर, तामिळनाडूच्या प्रणव रेथीन, महालिंगम खांदवेल, हरियाणाच्या तेजस आहुजा, सिद्धांत शर्मा, कर्नाटकाच्या क्रिश त्यागी, रजनी रूरिक या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
दुसरी(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:
प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1) वि.वि.अक्षज सुब्रमणियन(गुजरात)6-0, 6-0;
समर्थ सहिता(महाराष्ट्र) वि.वि.आराध्य क्षितिज(कर्नाटक)6-3, 6-4;
रयान कुथार्थ(केरळ) वि.वि.अभिराम निलाखे(महाराष्ट्र)6-3, 6-0;
वेंकट बटलंकी(तेलंगणा)(6) वि.वि.आराध्य व्दिवेदी(कर्नाटक)6-2, 6-3;
तेजस आहुजा(हरियाणा)(3) वि.वि.विशाल एम(कर्नाटक)6-4, 6-3;
रजनी रूरिक(कर्नाटक)वि.वि.वेदांत भसिन(महाराष्ट्र)6-3, 6-2;
सेंजम अश्वजीत(मणिपूर)(7) वि.वि. तनुष घिल्डयाल(कर्नाटक)6-4, 6-3;
महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5) वि.वि.जेवीन कनानी(गुजरात)6-0, 6-0;
सिद्धांत शर्मा(हरियाणा)(8)वि.वि.प्रणव मिश्रा(उत्तरप्रदेश)6-1, 6-0;
अर्णव पापरकर(महाराष्ट्र)वि.वि.श्रीनिकेत कन्नन(कर्नाटक)6-2, 6-2;
क्रिश त्यागी(कर्नाटक)(2) वि.वि.विष्णू भालचंदर(कर्नाटक)6-1, 6-0;
हितेश शर्मा(पंजाब)वि.वि.अर्णव यादव(उत्तराखंड) 6-3, 7-6(4);
मुली:
माहिका खन्ना(उत्तराखंड)वि.वि.समीक्षा दबस(दिल्ली)(1) 7-6(7), 6-4;
आस्मि आडकर(महाराष्ट्र)वि.वि.क्रीशा दलाल(गुजरात) 6-1, 6-2;
ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र)वि.वि.वामिका शर्मा(दिल्ली) 6-1, 6-2;
थानिया गोगुलामंडा(तेलंगणा)(5) वि.वि.आराध्या वर्मा(ओरिसा)3-6, 6-3, 6-2;
साईजयानी बॅनर्जी(पश्चिम बंगाल)वि.वि.अवनी चितळे(महाराष्ट्र)6-4, 6-3;
संजना देवीनेनी(कर्नाटक)(7) वि.वि.आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र)6-1, 6-1;
वाण्या श्रीवास्तव(कर्नाटक)वि.वि.प्रियांका राणा(गुजरात)6-4, 6-3;
कनूमुरी इकराजू(तेलंगणा)(6) वि.वि.आदिती त्यागी(हरियाणा) 6-0, 6-1.