---Advertisement---

सुपरस्टार झाला तरी संस्कार विसरला नाही… वैभव सूर्यवंशीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

On: बुधवार, एप्रिल 8, 2026 7:10 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ १४ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र त्याच्या फलंदाजीपेक्षा सामन्यानंतर केलेल्या एका कृतीमुळे त्याच्या संस्कारांची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सामना संपल्यानंतर वैभवने प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा यांनाही भेटल्यानंतर वैभवने अशीच नम्रता दाखवली होती.

सोशल मीडियावर चाहत्यांनी “टॅलेंटसोबत संस्कार, हाच खरा स्टार” अशा प्रतिक्रिया देत वैभवचे कौतुक केले आहे. त्याच्या या वागण्यातून तो फक्त मैदानावरच नव्हे, तर लोकांच्या मनातही स्थान निर्माण करत असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, पावसामुळे ११-११ षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत ५ षटकांतच ८० धावा ठोकल्या. यशस्वी जयस्वालने ३२ चेंडूत नाबाद ७७ धावा करत संघाला भक्कम पाया दिला, तर वैभवने १४ चेंडूत ३९ धावा करत आक्रमक साथ दिली. परिणामी राजस्थानने ११ षटकांत ३ बाद १५० धावांचा मोठा डोंगर उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी कोसळली. संघाला ९ बाद १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मान्य केले की, जयस्वाल आणि सूर्यवंशी यांच्या तुफानी फलंदाजीसमोर त्यांचा संघ पूर्णपणे गोंधळला. त्यांनी गोलंदाजांच्या लाइन-लेंथवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाजही थोडा चुकल्याचे सांगितले.

या विजयासह राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---