---Advertisement---

वैभव सूर्यवंशी करणार मोठा इतिहास? अनिल कुंबळेंनी केली ‘या’ विक्रमाबाबत धक्कादायक भविष्यवाणी!

On: बुधवार, मे 20, 2026 4:43 PM
---Advertisement---

अनिल कुंबळे यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं जोरदार कौतुक करताना मोठं भाकीत केलं आहे. कुंबळे यांच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे.

सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2026 हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 53 षटकार ठोकले आहेत. गेलने 2012 मध्ये एका हंगामात 59 षटकार मारण्याचा विक्रम केला होता आणि वैभव त्या विक्रमापासून आता फक्त 6 षटकार दूर आहे.

बुधवारी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 38 चेंडूत 93 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 10 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्या या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 221 धावांचं मोठं लक्ष्य 7 विकेट राखून सहज गाठलं.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अनिल कुंबळे म्हणाले, “वैभवने या हंगामात आधीच 53 षटकार मारले आहेत. एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, पण मला वाटतं वैभव सूर्यवंशी हा विक्रम मोडून इतिहास रचू शकतो.”

वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या एका हंगामात 50 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

कुंबळे पुढे म्हणाले, “कव्हरच्या वरून इतक्या सहज षटकार मारणारे फार कमी फलंदाज असतात. पण वैभवने दिग्वेश राठीविरुद्ध अनेकदा हे करून दाखवलं. एवढ्या लहान वयातही त्याच्यात जबरदस्त परिपक्वता दिसते. हा मुलगा खरोखरच खूप खास आहे.”

गेल्या हंगामात आयपीएल पदार्पण करणाऱ्या वैभवने आपल्या पहिल्याच सिझनमध्ये अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत मोठी खळबळ उडवली होती. आयपीएल इतिहासातील कोणत्याही भारतीय फलंदाजाचं ते सर्वात वेगवान शतक ठरलं होतं. मात्र आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम अजूनही गेलच्या नावावर असून त्याने फक्त 30 चेंडूत शतक ठोकलं होतं.

वैभव सूर्यवंशीने याआधीच सांगितलं आहे की, त्याचं लक्ष्य गेलचे मोठे विक्रम मोडण्याचं आहे. त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आता त्याला भारतीय वरिष्ठ संघात संधी द्यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

वैभवच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूने आतापर्यंत 20 सामन्यांत 41.55 च्या सरासरीने 831 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 शतकं आणि 4 अर्धशतकं आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 226.43 इतका आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---