पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, एमसीए 1 या संघांनी अनुक्रमे कॅडेन्स व एमसीए 2 या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना व पूना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात सौरभ नवलेच्या 49धावांसह विकी ओस्तवाल(4-30)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने कॅडेन्स संघाचा 49धावांनी पराभव केला.
कॅडेन्स संघाच्या गौरव कोमकर(4-3, अभिजित सावळे( 3-40), हर्षल काटे(1-21), ह्रितेक सुरेका(1-30)यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीला 43.2षटकात 195धावापर्यंतच मजल मारता आली. यामध्ये सौरभ नवले 49, अद्वैत मुळे 30, ओम भोसले 24, हर्षवर्धन पाटील 14, राहुल वारे 14, यश जगदाळे 12यांनी संघाच्या डावाला आकार दिला. 195 धावांचा पाठलाग करताना कॅडेन्स संघ 39षटकात 146धावाच करू शकला.
कौशल तांबे 63, हर्षल काटे 23, प्रद्युम्न चव्हाण 19, अभिजित सावळे नाबाद 17यांनी दिलेली लढत अपूरी ठरली. व्हेरॉककडून विकी ओस्तवालने 30धावात 4गडी बाद केले. विकीला हर्षवर्धन पाटील(2-16) व साईगणेश विडप(2-27)यांनी प्रत्येकी दोन गडी, तर अॅलन रॉड्रिगेसने(1-33)एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी सौरभ नवले ठरला.
दुसऱ्या सामन्यात तनिश जैन(नाबाद 54धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एमसीए 1 संघाने एमसीए 2 संघाचा 8गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. पहिल्यांदा खेळताना एमसीए 2 संघाचा डाव 40.3षटकात 112धावांवर संपुष्टात आला. यात योगेश डोंगरेने सर्वाधिक 44धावा केल्या.
एमसीए 1 संघाकडून हार्दिक अदक(2-18), वेंकटेश काने(2-5), सत्यजीत नाईक(2-24), ओंकार मोहिते(2-27)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 112धावांचे आव्हान एमसीए 1: 28.4षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 116धावा करून पूर्ण केले. यात तनिश जैनने 72चेंडूत नाबाद 54धावा, यश यादवने 60चेंडूत नाबाद 34धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर हा ‘किताब तनिश जैनला देण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 43.2 षटकात सर्वबाद 195धावा(सौरभ नवले 49(40), अद्वैत मुळे 30(97), ओम भोसले 24(27), हर्षवर्धन पाटील 14(14), राहुल वारे 14(12), यश जगदाळे 12, गौरव कोमकर 4-35, अभिजित सावळे 3-40, हर्षल काटे 1-21, ह्रितेक सुरेका 1-30)वि.वि.कॅडेन्स: 39षटकात सर्वबाद 146धावा(कौशल तांबे 63(93), हर्षल काटे 23(44), प्रद्युम्न चव्हाण 19(40), अभिजित सावळे नाबाद 17, विकी ओस्तवाल 4-30, हर्षवर्धन पाटील 2-16, साईगणेश विडप 2-27, अॅलन रॉड्रिगेस 1-33);सामनावीर- सौरभ नवले;
एमसीए 2: 40.3 षटकात सर्वबाद 112(योगेश डोंगरे 44(63), प्रशांत ढोले 12(28), प्रद्युम्न महाजन 12(24), हार्दिक अदक 2-18, वेंकटेश काने 2-5, सत्यजीत नाईक 2-24, ओंकार मोहिते 2-27)पराभूत वि.एमसीए 1: 28.4षटकात 2बाद 116धावा(तनिश जैन नाबाद 54(72), यश यादव नाबाद 34(60), ओंकार गावडे 14(19), योगेश डोंगरे 1-17, रामेश्वर दौड 1-25);सामनावीर-तनिश जैन.