नुकतीच भारत-इंग्लंड (India vs England) संघात टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत 4-1 ने मालिका जिंकली. तसेच भारताचा स्टार फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्यासाठी त्याला मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी वरूण चक्रवर्तीचा (6 फेब्रुवारी) पासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
याचबरोबर वरूण चक्रवर्तीच्या टी20 मधील प्रभावी कामगिरीमुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आता असे सांगण्याात येत आहे की, आगामी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॅाफीसाठी सुध्दा त्याला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. परंतु सर्व 8 संघ (12 फेब्रुवारी) पर्यंत आपल्या संघात बदल करू शकतात.
(6 फेब्रुवारी) पासून भारत-इंग्लंड दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तसेच मालिकेतील शेवटचा सामना (12 फेब्रुवारी) रोजी खेळला जाईल. वनडे मालिकेतील 3 सामन्यातील वरूणचे खेळातील प्रदर्शन बघून त्याला चॅम्पियन्स ट्रॅाफीमध्ये संघात स्थान दिले जाऊ शकते. आता खरच वरूणला चॅम्पियन्स ट्रॅाफीसाठी संघात स्थान मिळेल का? हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरेल.
आत्तापर्यंत वरूण चक्रवर्तीने भारतीय संघासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्याने फक्त भारतीय संघासाठी 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 14.57च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 17 धावात 5 विकेट अशी आहे.
वनडे सामन्यापूर्वी भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत वरूण चक्रवर्ती विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. वरूणने 5 सामन्यात 9.86च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यासाठी त्याला मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्मधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका
वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुजाळला सुवर्ण