इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा सुरक्षितरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवले जात आहेत. कडक बायो बबल असून सुद्धा कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना सोमवारी (३ मे) कोरोनाची लागण झाल्याचे कळाले होते. यात वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा समावेश होता. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाहत्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे की, बायो बबलमध्ये असताना देखील चक्रवर्ती आणि वॉरियरला कोरोनाची लागण झालीच कशी?
सोमवारी (३ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जाणार होता. परंतु या सामन्यापूर्वीच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आले होते. ही बातमी येताच सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणाऱ्या सामन्याला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला होता.
वरुण चक्रवर्तीला कशी झाली कोरोनाची लागण
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, चक्रवर्ती बायो बाबलच्या बाहेर गेला होता. तो खांद्याच्या स्कॅन करण्यासाठी अधिकृत ग्रीन चॅनेलद्वारे बायो बबल बाहेर गेला होता. असे म्हटले जात आहे की, यावेळी चक्रवर्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असावी. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, खेळाडूंना खासगी वाहनातून पीपीई किट घालून रुग्णालयात नेण्याची परवानगी आहे. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी येणारे वैद्यकीय कर्मचारीसुद्धा पीपीई किट परिधान करतात.
नाही तोडला प्रोटोकॉल
अशी माहिती मिळत आहे की, रुग्णालयात जाताना वरूनने ज्या ग्रीन चॅनेलचा वापर केला होता. तसेच रुग्णालयात जाताना आणि येताना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले गेले होते. तरीदेखील प्रोटोकॉलच्या आत खेळाडूला कोरोनाची लागण होणे चिंताजनक आहे. कारण हे खेळाडू एकाच संघात खेळतात, ते एकमेकांच्या संपर्कात येत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! घरी परतलेल्या अश्विनचे होणार पुनरागमन, ‘या’ दिवशी येण्याची शक्यता
केकेआरच्या खेळाडूवर कोसळला संकटाचा डोंगर, आधी टीममेट कोरोना पॉझिटिव्ह; मग जवळच्या नातेवाईकाने निधन
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल; आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार