सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला तमिळनाडूचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती हा पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत आहे. मागील वर्षी शानदार कामगिरी केलेला वरूण यावर्षी मात्र पूर्णतः अपयशी ठरला. त्यानंतर त्याने आता पुनरागमनचा निर्धार केला असून, आगामी देशांतर्गत हंगाम व आयपीएलमधून पुनरागमन करण्याची तो योजना आखत आहे.
वरुण चक्रवर्ती 2021 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. आयपीएल 2021 मध्ये त्याने चमकदार कामगिरी केलेली. याच कारणामुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले. मात्र, या सर्वात मोठ्या मंचावर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सातत्याच्या अभावामुळे तो भारतीय संघातून बाहेर पडला. टी20 विश्वचषक स्पर्धेत वरुण चक्रवर्ती केवळ एक बळी घेऊ शकला. तसेच तो खूप महागडाही ठरला होता. आणि त्याने भरपूर धावा दिल्या. त्यानंतर यावर्षी तो आयपीएलमध्ये देखील अपयशी ठरला.
त्यानंतर आता वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं व्यासपीठ आहे. मी खूप मेहनत केल्यामुळे मी पुन्हा एकदा संघात परतेन असा मला विश्वास आहे. देवाची इच्छा असेल तर मला आणखी एक संधी मिळेल. मला माहित आहे की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खूप महत्वाची असणार आहे. याशिवाय आयपीएलवरही बरेच काही अवलंबून असेल. या दोन्ही स्पर्धांमध्ये मी चांगली कामगिरी केली तर मला आणखी एक संधी मिळेल.”
वरूण चक्रवर्ती आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या अनोख्या गोलंदाजीमुळे मिस्ट्री स्पिनर अशी उपाधी देखील त्याला देण्यात आली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री