वेदाची विंडीजमध्ये नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताकडून खेळताना खराब कामगिरी झाली होती. तिला एकाही सामन्यात दोन आकडी धावसंख्या गाठण्यात अपयश आले आहे. तिला या खराब कामगिरीचा फटका बसला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व मिताली राज तर टी20 संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.
त्याचबरोबर 22 वर्षीय दिल्लीची सलामीवीर फलंदाज प्रिया पुनीयाला प्रथमच भारताच्या टी20 संघात स्थान देण्यात आले आहे. तिने नुकतेच वरिष्ठ महिला वनडे लीगमध्ये दोन शतके केली आहेत.
तसेच शिखा पांडेचे टी20 संघात पुनरागमन झाले आहे. याचबरोबर टी20 संघातून वेदासह पुजा वस्त्राकारलाही वगळण्यात आले आहे. तिच्या ऐवजी देविका विद्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
पुजा विंडीजमधील नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताकडून खेळली आहे.
या विश्वचषकानंतर भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज यांच्यातील वाद सर्वांसमोर आले होते. या वादानंतर बीसीसीआयने डब्ल्यूव्ही रमण यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
हा दौरा 24 जानेवारी पासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यात महिला संघ रमण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल.
असा आहे भारतीय महिला संघाचा वनडे संघ-
मिताली राज(कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्म्रीती मानधना, पुनम राऊत, दीप्ति शर्मा, दयालन हेमालता, जेमिमा रॉड्रिगेज, मोना मेश्राम, तानिया भाटिया, एकता बिष्त, पूनम यादव, राजेश्वरीगायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, शिखा पांडे
असा आहे भारतीय महिला संघाचा टी20 संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना, (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्त, दयालन हेमालता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, प्रिया पूनिया, शिखा पांडे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कपसाठी कर्णधार सुनिल छेत्रीची टीम इंडिया तयार
–एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास