महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम शनिवारी (4 मार्च) सुरू झाला. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या संगांमध्ये आयोजित केला गेला. डब्ल्यूपीएलच्या हा पहिल्या हंगामात बीसीसीआयने मुंबई आणि गुजरातसह एकूण पाच संघ मैदानात उतरवले आहेत. या पाच पैकी दोन संघांच्या कर्णधार भारतीय आहेत, तर तीन संघांचे नेतृत्व विदेशी खेळाडू करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाची दिग्गज खेळाडू वेदा कृष्णमूर्ति हिने आश्चर्य व्यक्त केले.
मुंबई इंडियन्स महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलरचे नेतृत्व स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्याकडे सोपवले गेले आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी (Beth Mooney) असणार आहे, तर यूपी वॉरिअर्स संघाचे नेतृत्व एलिसा हिली (Alyssa Healy) हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. दिल्ली संघाचे नेतृत्व या विदेशी मॅग लेनिंगकडे असणार आहे. खेळाडूंकडे संघाचे नेतृत्व सोपवल्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये नाराजी असल्याचे दिसते. अशातच वेदा कृष्णामूर्ती (Veda Krishnamurthy) हिने मनातील रीच नाराजी हलकीशी बोलून दाखवली. जिओ सिनेमाचा कार्यक्रम आकाशवाणी वर भारताचे माजी क्रिकेटपटू आकास चोप्रा यांनी वेदा कृष्णमूर्तिने बेथ मुनी आणि एलिसा हिली यांचे नाव कर्णधारपदासाठी पुढे केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले.
आकाश चोप्राच्या कार्यक्रमात कृष्णमूर्ती म्हणाली, “मेग लेनिंगला कर्णधार बनवणे आश्चर्याचे आहे. आम्हाला पूर्ण आशा होती की, दिल्ली संघ पूर्ण विचारपूर्व बनवला जाईल. पण एलिसा हिली आणि बेथ मुनी कर्णधार बनल्यामुळेही मी हैराण आहे. मला वाटते दिल्ती शर्मा यूपी वॉरियर्सची कर्णधार बनू शकत होती. जेव्हा लिलाव संपला, तेव्हा आम्हाला ही गोष्ट माहीत होती की, गुजरात जायंट्सने विदेशी खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित केले होते आणि भारतीय कर्णधाराचा विचार केला नव्हता. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केलीच जात होती की, त्यांच्याकडे एक विदेशी कर्णधार असेल. पण हे थोडे आश्चर्यकारक होते की, एश्ले गार्डनरच्या आधी बेथ मुनीचा विचार कर्णधारपदासाठी केला गेला.”
यावेळी वेदा कृष्णमूर्तीने हे मान्य केले की, महिला प्रीमियर लीगमध्ये सर्व कर्णधार भारतीय पाहिजे होते. विदेशी खेळाडूंच्या मदतीने संघातील कम्युनिकेश होऊ शकत होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही 5 पैकी 3 संघाच्या कर्णदार विदेशी, तर दोन कर्णधार भारतीय आहेत. (Veda Krishnamurthy upset with foreign captains in WPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘याचा एक पाय चंदीगडमध्ये आणि दुसरा…’, श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज
बॅटच्या मधोमध लागला चेंडू, कर्णधाराने झटकन घेतला रिव्ह्यू; आता जगभरात उडवली जातेय खिल्ली, पाहा व्हिडिओ