---Advertisement---

अंबानी-अदानी नव्हेतर ‘हा’ भारतीय उद्योगपती 650 कोटी खर्चून बांधतोय स्टेडियम! महाराष्ट्रात राहिलेले चर्चेचा विषय

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 5:00 PM
---Advertisement---

राजस्थान क्रिकेट असोसिएशनद्वारे (आरसीए) जयपूरमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम तयार होणार आहे. या स्टेडियममध्ये प्रसिद्ध उद्योगपती वेदांत समूहाचे सर्वेसर्वा अनिल अगरवाल यांची मोठी भागीदारी राहणार असून, त्यांचेच नाव या स्टेडियमला देण्यात येईल. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 75,000 इतकी सांगण्यात येत आहे.

हे स्टेडियम 100 एकर जागेत तयार होणार आहे. ही जमीन चौंप गावात आहे. या स्टेडियममध्ये बहुउद्देशीय प्रशिक्षण अकादमी, इंडोर गेम्सची सुविधा, क्लब हाऊस, 4 हजार कारसाठी पार्किंग, पब्लिक ट्रांन्सपोर्टसाठी खास सुविधा करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममध्ये 2 रेस्टोरंटची सुविधा देखील करण्यात येणार आहे. तसेच या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे 2 मैदाने असतील. तिथे 30 प्रॅक्टिसनेट असतील. या व्यतिरिक्त 250 सीटांची प्रेस कॉन्फरन्स रुम वेगळी असेल. स्टेडियम बांधणीच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 400 कोटींचा खर्च केला जाईल. त्यानंतर आणखी 150 कोटींची भर या खर्चात पडू शकते.

 

अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेट स्टेडियमनंतरचे भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार इतकी आहे. मोटेरा पाठोपाठ जगात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियम दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. मेलबर्न स्टेडियमची 1 लाख प्रेक्षक क्षमता आहे. या नंतर आता जगातील सर्वोत मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या यादीत जयपूरच्या स्टेडियमचा क्रमांक लागू शकतो.

सवाई मानसिंह स्टेडियमचे महत्व होणार कमी
सध्या राजस्थानमधील सर्वात मोठे स्टेडियम जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम आहे. या स्टेडियमची क्षमता केवळ ३०,००० इतकी असून या ठिकाणी जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले नाहीत. २०१३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना या मैदानावरील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे हे घरचे मैदान आहे.

(Vedanta, Group RCA And BCCI Built Anil Agarwal Stadium In Rajasthan It’s World Third Biggest Cricket Stadium)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?
आयपीएलचा किताब न जिंकणारे 4 संघ, 2 नवीन कर्णधारासोबत उतरणार मैदानात, यावेळी फळफळणार का नशीब?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---