कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ४१वा सामना झाला. केकेआरने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा कस लागला, पण अखेर चार विकेट्सने दिल्लीने सामना जिंकला. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. हंगामातील वेंकटेशचे निराशाजनक प्रदर्शन पाहता तो आगामी आयसीसी टी२० विश्वचषक संघात स्वतःचे स्थान बनवू शकेल, याविषयी शंका निर्माण झाली आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीये. यावर्षी त्याचे प्रदर्शन दिवसेंदिवस खालावताना दिसले आहे. चालू आयपीएल हंगामात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक निघाले आहे. त्याव्यतिरिक्त त्याने चालू हंगामात फक्त २ षटके गोलंदाजी केली आहे. अशात आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ (ICC T20 World cup 2022) मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळणे कठीण दिसत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चालू हंगामातील वेंकटेशने केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. हंगामातील सुरुवातीच्या ८ सामन्यात त्याने केकेआरला फक्त १२६ धावांचे योगदान दिले आहे. या धावा त्याने १८च्या सरसारीने केल्या आहेत. या हंगामात त्याचा स्ट्राईक रेट देखील खाली घसरून १०२.४४ वर आला आहे.
वेंकटेश पॉवरप्लेमध्ये धमाकेदार फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, पण चालू हंगामात पॉवरप्लेमध्येही त्याला कमाल करता आली नाहीये. चालू हंगामात खेळलेल्या ७ डावांमध्ये त्याने पॉवरप्लेमध्ये अवघ्या ७७ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ८८.५० राहिला आहे. तसेच, सरासरी १५.४० राहिली आहे. यात सात डावांमध्ये तो ५ वेळा बाद झाला आहे.
वेंकटेश अय्यर मागच्या काही दिवसांमध्ये अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याला पर्याय म्हणून समोर येऊ लागला होता. परंतु आयपीएलमधील प्रदर्शनानंतर हार्दिक त्याच्यापेक्षा सरस ठरला आहे. हार्दिकने चालू हंगामात आतापर्यंत ३०५ धावा केल्या आहेत. हार्दिक सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता आगामी टी२० विश्वचषकात त्याला संधी मिळू शकते. वेंकटेशला जर विश्वचषक खेळायचा असेल, तर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
दरम्यान, केकेआर आणि दिल्ली यांच्यातील गुरुवारच्या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीने ४ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरने ९ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि एक षटक शिल्लक ठेवून गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरान मलिकने हार्दिक पंड्याच्या पत्नीची हात जोडून मागितली क्षमा, पण का? घ्या जाणून
धोनीचा शिष्य शोभतोय! पंतने अवघड कॅच घेत कोलकाताच्या कर्णधाराला धाडले तंबूत; त्यालाही बसेना विश्वास
सुनिल नारायणने रचला इतिहास, दिल्लीची एकमेव विकेट घेत पूर्ण केले खास ‘दीडशतक’