भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याचे बाईक्सवर असणारे प्रेम कधी लपून राहिले नाही. भारतीय क्रिकेट संघाला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन काही वर्ष झाली. पण आजही चाहत्यांमधील त्याचे आकर्षण जराही कमी झाले नाहीये. धोनीच्या रांचीतील घराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्याने मागच्या बऱ्याच वर्षांपासून जमा केलेले बाईक कलेक्शन चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) अनेकदा रांचीत क्रिकेटचा सराव करण्यासाठी बाईकवरून गेल्याचे दिसले आहे. भारतीय क्रिकेटच्या या माजी दिग्गजाला बाईकविषयी असणारे आकर्षण हे वाखानण्याजोगे आहे. एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि ती जोपासणे आपल्यापैकी प्रत्येकाला जमतेच असे नाही. पण धोनीने आपली आवड व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून जोपासली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी एका मोठ्या जागेत बाईक कलेक्शन केले आहे. याठिकाणी एकापेक्षा एक प्रकारच्या बाईक्स त्याने जमा केल्या आहेत. अर्थात या कलेक्शनची किंमत लावणे देखील कठीणच आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि अष्टपैलू सुनील जोशी (Sunil Joshi) यांनी धोनीच्या या बाईक कलेक्शनला भेट दिली.
वेंकटेश प्रसाद यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. प्रसाद यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी पाहिलेले सर्वात विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे धोनी आहे. हे कलेक्शन आहे आणि व्यक्ती म्हणून तो देखील जबरदस्त आहे. एक महान अणि अविश्वसनीय व्यक्तिमत्व. त्याच्या रांचीतील घरातील बाईक आणि कार कलेक्शनची ही एक झलक आहे.”
One of the craziest passion i have seen in a person. What a collection and what a man MSD is . A great achiever and a even more incredible person. This is a glimpse of his collection of bikes and cars in his Ranchi house.
Just blown away by the man and his passion @msdhoni pic.twitter.com/avtYwVNNOz— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 17, 2023
दरम्यान, प्रसादांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस या व्हिडिओवर पडत आहे. दरम्यान, धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो अजूनही खेळत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ पाच वेळा आयपीएल विजेता बनला आहे. यावर्षी धोनी आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार, असे बोलले जात होते. मात्र अद्याप त्याने निवृत्ती घोषित केली नाहीये. अशात आगामी आयपीएल हंगामातही तो सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. (Venkatesh Prasad shared a video of MS Dhoni’s bike and car collection)
महत्वाच्या बातम्या –
पुणेरी पटलण टेबल टेनिस संघाची UTT सीझन 4 मध्ये पहिल्या विजयाची नोंद
“तुम्ही फक्त फिट असल्याचे दाखवता”, गावसकरांचा रोहितसह टीम इंडियावर पुन्हा निशाणा