---Advertisement---

‘दुसऱ्यांना डावलून त्यालाच संधी का?’, शून्यावर बाद झालेल्या श्रेयस अय्यरवर माजी दिग्गजाचा निशाणा

On: शनिवार, जुलै 30, 2022 3:10 PM
Shreyas-Iyer-1
---Advertisement---

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय ६८ धावांनी मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि वेस्ट इंडीजने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीय संघाने या सामन्यात मोठी धावसंख्या केली, परंतु वरच्या फलीतील श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. आता श्रेयसवर टीका करणाऱ्यांमध्ये भारताचे माजी  क्रिकेटपटू वेंकंटेश प्रसाद यांचेही नाव सामील झाले आहे. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. संघात सध्या इशान किशन, दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन असे पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले गेले. तर दुसरीकडे श्रेयसला मात्र प्लेइंग इलेव्हमध्ये संधी दिली गेली. श्रेयसला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केल्यामुळे वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) देखील खुश दिसत नाहीत.

वेंकटेश प्रसादांच्या मते आगामी काळाता खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताने त्यांची प्लेइंग इलेव्हन निश्चित केला पाहिजे. अधिकृत ट्वीटरवर खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “आगामी टी-२० विश्वचषक पाहता संघाची निवड ही खूप चिंतेची बाब असावी. जेव्हा तुमच्याकडे संजू सॅमसन, दीपक हुड्डा आणि इशान किशन असे खेळाडू आहेत, तर श्रेयस अय्यरला टी-२० सामन्यात खेळवणे विचित्र आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल हे निश्चितपणे खेळतीलच. अशात संघाने चांगले संतुलन मिळवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.”

https://twitter.com/venkateshprasad/status/1553055267679391744?s=20&t=hNoiVSEQ7WjC1t8-t-7pig

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---