---Advertisement---

टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

On: बुधवार, जुलै 31, 2019 7:47 PM
---Advertisement---

भारताचा फलंदाज आणि आंध्रप्रदेशचा माजी कर्णधार वेणुगोपाल रावने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती खेळली आहे. वेणुगोपालने भारतासाठी 16 वनडे खेळले आहेत. यामध्ये 218 धावा केल्या असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

वेणुगोपालने 30 जूलै 2005 ला दांबुला येथे श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी शेवटचा वनडे सामना वेस्ट इंडीज विरुद्ध 23 मे 2006 ला खेळला. त्यानंतर त्याला भारताच्या संघात संधी मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास काही केले नसले तरी 37 वर्षीय वेणुगोपालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 1998-99 च्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच 1999 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही तो भाग होता. त्यावेळी त्या संघात युवराज सिंग, मोहम्मद कैफ हे खेळाडू होते.

त्याने 121 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 40.93 च्या सरासरीने 7081 धावा केल्या आहेत. यात 228 धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणीमध्ये त्याने 17 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत.

त्याने 2012 नंतर गुजरातचेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले. पण तो पुन्हा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या घरच्या संघाकडे(आंध्रप्रदेश) परतला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना आंध्रप्रदेशकडून तमिळनाडू विरुद्ध 2017 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळला.

वेणुगोपालने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 137 सामन्यात 38.77 च्या सरासरीने 4110 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतकांचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स, सनरायझर्स हैद्राबाद या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये त्याने एकूण 65 सामने खेळताना 985 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आणखी एका नावाचा समावेश; या माजी क्रिकेटपटूने केला अर्ज

श्रीलंका आजचा सामना करणार या दिग्गज खेळाडूला समर्पित, जाणून घ्या कारण

२१ चेंडूत शतक करणारा हा फलंदाज करणार टीम इंडियाचे नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment