मंगळवारी (२ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने होते. अबू धाबीच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ८४ धावांवर गुंडाळला. त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या १३.३ षटकात पूर्ण करत दक्षिण आफ्रिका संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि मेहदी हसन या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, दक्षिण आफ्रिका संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला क्विंटन डी कॉक चांगल्याच लयीत दिसून येत होता. त्यावेळी बांगलादेश संघाकडून ५ वे षटक टाकण्यासाठी मेहदी हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने जागा बनवून शॉट खेळत कव्हरच्या वरून चौकार मारला. इतकेच नव्हे तर पुढच्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्वीप शॉट खेळत चौकार मारला.
हे दोन अप्रतिम शॉट पाहून, गोलंदाजाने आपले नियंत्रण गमावले होते. परंतु पुढच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा जागा बनवून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात चेंडू टप्पा पडून आत आला आणि यष्टीला जाऊन धडकला. क्विंटन डी कॉक १६ धावा करत माघारी परतला. क्विंटन डी कॉक त्रिफळाचित झाल्यानंतर मेहदी हसनने संतापात अपशब्दांचा वापर केला. परंतु क्विंटन डी कॉकने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने गेला.
https://www.instagram.com/reel/CVxfnJLl5Zy/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/reel/CVxfwJWFpmi/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेश संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मेहदी हसनने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. तर लिटन दासने २४ धावांचे योगदान दिले. बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव १८.२ षटकात ८४ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून कर्णधार टेंबा बावूमाने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तर रासी वान दर दूसेनने २२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्ती घेतलेल्या असगर अफगानच्या जागी ‘या’ खेळाडूची लागली वर्णी, भारतीय संघाला देणार टक्कर
ओ लडका आँख मारे! कर्णधार आझमला बाद केल्यानंतर गोलंदाजाने मारला डोळा, पाहा मजेशीर व्हिडिओ
भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!






