पुणे, 7 फेब्रुवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरिटास, यार्डी, टेक महिंद्रा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात ऋषी पारेख(54धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व्हेरिटास संघाने मर्क्स संघाचा 5गडी राखुन पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मर्क्स संघाचा डाव 19.5 षटकांत सर्वबाद 122धावावर कोसळला. यात आदित्य साळुंखे 30, दिनेश वाडकर 20, बैभब मिश्रा 21 यांनी धावा केल्या. व्हेरिटास संघाकडून अमृत आलोक(3-19),अनिल घुगे(3-20), आशुतोष देशमुख(2-19) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात व्हेरिटास संघाने हे आव्हान 18.2 षटकात 5बाद 124धावा करून पूर्ण केले. यात ऋषी पारेखने 52चेंडूत 8चौकारासह 54 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला प्रणव पवारने 34चेंडूत 4 चौकारासह 42 धावा काढून साथ दिली.
दुसऱ्या लढतीत स्वप्नील सावगावे 45धावा व 1-23)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड संघावर 1धावेने थरारक विजय मिळवला. अन्य लढतीत प्रीतम गुजरे नाबाद 26 धावांच्या जोरावर यार्डी संघाने एसएस अँड सी ॲडव्हेंट संघाचा 3 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. (Veritas, Yardi, Tech Mahindra win 18th Ankur Joglekar Memorial Inter IT Cup Cricket Championship)
निकाल: साखळी फेरी:
मर्क्स:19.5 षटकांत सर्वबाद 122धावा(आदित्य साळुंखे 30, दिनेश वाडकर 20, बैभब मिश्रा 21, अमृत आलोक 3-19, अनिल घुगे 3-20, आशुतोष देशमुख 2-19) पराभुत वि.व्हेरिटास:18.2 षटकात 5बाद 124धावा(ऋषी पारेख 54(52,8×4), प्रणव पवार 42(34,4×4), प्रियांक चौहान 4-13);सामनावीर-ऋषी पारेख; व्हेरिटास संघ 5गडी राखुन विजयी;
एसएस अँड सी ॲडव्हेंट: 20षटकात 7बाद 161धावा(मनीष सुपल 54(37,10×4,1×6), हरीश केआर 20, रंजीत कर्था नाबाद 20, सौरभ देवरे 2-27, हृषिकेश पटवर्धन 2-20)पराभुत वि.यार्डी: 19.4षटकात 7बाद 163धावा(हृषिकेश पटवर्धन 36(26,6×4), अमेय पाडे 32(32,4×4), प्रीतम गुजरे नाबाद 26, आशु शेख 17, आदित्य मोहन 3-28); सामनावीर-प्रीतम गुजारे; यार्डी 3 गडी राखून विजयी;
टेक महिंद्रा: 20 षटकात 7बाद 137धावा(स्वप्नील सावगावे 45(38,3×4), अमितोश निखार 35(23,3×4,2×6), सय्यद पटेल 21, रोहित देवगावकर 2-25)वि.वि.सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड:20 षटकात 6बाद 136धावा(अविनाश माळी 37(34,4×4), पुरुषोत्तम पाठक 28, आशिष ढमाल 20, सचिन कुलकर्णी 2-27, स्वप्नील सावगावे 1-23, अमितोश निखार 1-22); सामनावीर – स्वप्नील सावगावे; टेक महिंद्रा संघ 1धावेने विजयी;
महत्वाच्या बातम्या –
L&T मुंबई ओपन डब्लूटीए टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, ऋतुजा भोसले यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
जगातील नाही, फक्त भारतातील बेस्ट बॅटर? विराटविषयी काय बोलून गेला मोहम्मद शमी