---Advertisement---

‘विराट ठग नाही, तो एक उत्कृष्ठ खेळाडू’, कोहलीला टार्गेट करणाऱ्या इंग्लिश मीडियावर दिग्गजाचा संताप

Virat-Kohli-Test-1
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबस्टन कसोटीत विराट कोहली चांगले प्रदर्शन करू शकला नाही, पण मैदानातील त्याच्या वर्तनामुळे तो चांगलाच चर्चेत राहिला. जॉनी बेयरस्टो आणि विराटमध्ये मैदानात वादही झाल्याचे पाहिले गेले. याच पार्श्वभूमीवर विराटला इंग्लिश मिडियामध्ये एखाद्या खलनायकाप्रमाणे दाखवले गेले आहे. परंतु वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू टिनो बेस्टने विराटचे वर्तन योग्य असल्याचे सांगितले आहे आणि इंग्लिश मीडियावर पलटवार केला आहे.

इंग्लिश मीडियाच्या मते इंग्लंडचे खेळाडू बाद झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) ज्या पद्धतीने जल्लोष करत होता, तो योग्य नव्हता. तसेच विराटने एलेक्स लीस आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) सोबत खेळपट्टीवर वागला, तेदेखील बरोबर नव्हते. त्यांच्या मते विराटने असे केले नव्हते पाहिजे.

बुधवारी (६ जुलै) सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार जॉर्ज डोबेल (George Dobbell) याने ट्वीटरवर एक फोटो शेअर करत त्याच्यावर टीका केली आहे. फोटोमध्ये विराट खेळपट्टीच्या मध्यभागी विकेट मिळाल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहे. पत्रकाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एलेक्स लीस (Alex Lees) याच्या विकेटचा जल्लोष करण्यासाठी एक अनोखी जागा.’

https://twitter.com/tinobest/status/1544742840743460864?s=20&t=78fVO9LDlw0faUzC5ggAyQ

जॉर्ज डोबेल (George Dobbell) याने विराटवर टीका करण्यासाठी केलेल्या या ट्वीटवर टिनो बेस्ट (Tino Best) याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटवर प्रत्युत्तर देत त्याने लिहिले की, ‘विराट कोहली कोणता ठग नाहीये. तो आधुनिक काळातील उत्कृष्ट खेळाडू आहे. इंग्लिश मीडिया भारतीय खेळाडू विराटला खलनायकाच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण विराट इंग्रज नाहीये.’

https://twitter.com/tinobest/status/1544766017762631680?s=20&t=78fVO9LDlw0faUzC5ggAyQ

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबस्टन कसोटीत भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तर इंग्लंडने पहिल्या डावात २८४ धावा केल्या. दुसऱ्या डावात मात्र भारतीय संघ २४५ धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडला शेवटच्या डावात ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. इंग्लडने हे लक्ष्य अवघ्या ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. विराटने या सामन्याच्या पहिल्या डावात ११ तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

VIDEO। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच फलंदाजी करताना दिसला केएल राहुल, सुनील शेट्टीने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

‘विराट कोहली सचिन आणि ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा दावा

अखेर अर्शदीपला संधी मिळालीच! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---