---Advertisement---

VHT 2026: ऋतुराज गायकवाडने ठोकले शतक, हार्दिकचे वादळी अर्धशतक!

On: गुरूवार, जानेवारी 8, 2026 1:17 PM
---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफीचा सातवा राऊंड सुरू झाला असून सर्व संघ त्यांचे शेवटचे ग्रुप स्टेज सामने खेळत आहेत. हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटने तुफानी खेळी करत आगामी विश्वचषकासाठी मोठी घोषणा केली आहे. हार्दिकने अवघ्या 19 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. हार्दिकची एकूण खेळी 31 चेंडूंची होती ज्यामध्ये त्याने एकूण 2 चौकार आणि 9 षटकार लगावत 75 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला. याआधी हार्दिकने पहिल्या सामन्यात 92 चेंडूत 133 धावांची खेळी केली होती. तो राजकोटमध्ये ग्रुप बी च्या सामन्यात चंदिगढविरुद्ध बडोद्यासाठी खेळत होता.

अनुभवी मोहम्मद शमी रिंकू सिंगच्या उत्तर प्रदेश संघाविरुद्ध बंगालसाठी मैदानात उतरला आहे. मात्र, सर्वांचे लक्ष श्रेयस अय्यर आणि मुंबई संघावर असेल, जे ग्रुप सी च्या सामन्यात पंजाबविरुद्ध खेळत आहेत. आपल्या गेल्या सामन्यात श्रेयसने अवघ्या 53 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---