---Advertisement---

अमरावतीचा पठ्ठ्या टीम इंडियात! सॅमसनच्या दुखापतीनंतर मिळाली संधी

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 12:09 AM
Jitesh-Sharma
---Advertisement---

मंगळवारी (दि. 03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 2 धावांनी जिंकला. हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्याआधी प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने विदर्भाच्या जितेश शर्मा याचा संघात समावेश केला गेला आहे.

संजू सॅमसन याला पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, सूज आल्याने तो भारतीय संघासह पुणे येथे पोहोचला नाही. मुंबईत राहूनच तो या दुखापतीवर उपचार घेईल. त्याचा बदली खेळाडू म्हणून जितेश शर्मा याला संघात सहभागी केले गेले. परंतु, ईशान किशन हा संघाचा भाग असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

जितेश हा विदर्भ संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळताना त्याला ओळख मिळाली. त्याने पंजाबसाठी फिनिशरची भूमिका योग्यरित्या पार पाडत संघाच्या विजयात योगदान दिले. आपला पहिला संगम खेळत असलेल्या जितेशने 12 सामने खेळताना 163.6 च्या धमाकेदार स्ट्राइक रेटने 264 धावा फटकावल्या.

अमरावती येथे जन्मलेला जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करतो. 29 वर्षीय जितेश 2013-2014 हंगामापासून विदर्भ संघाचा भाग आहे. त्याच्या एकूण कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 16 प्रथमश्रेणी व 47 लिस्ट ए सामने खेळले आहेत. मात्र, टी20 क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याने 76 सामन्यात 30.29 च्या सरासरीने व 148 च्या स्ट्राईक रेटने 1787 धावा जमवल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.

(Vidarbha Wicketkeeper Jitesh Sharma Include In Team India As Sanju Samson Replacement Against Srilanka T20I Series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधीच संघातून बाहेर असणाऱ्या ‘या’ खेळाडूला चहलने डिवचले, व्हिडिओत कैद झाली घटना
तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---