---Advertisement---

तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून

Hardik-Pandya-And-Dasun-Shanaka
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने 2023 या नवीन वर्षाची सुरुवात एकदम दिमाखात केली आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने श्रीलंका संघाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली. अशात आता भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला, तर संघ मालिकेत 2-0ची आघाडी घेईल.

भारतीय क्रिकेट संघ तीन वर्षांनंतर पुण्यात खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदा 2012मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तो सामना भारताना 5 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर 2016मध्ये श्रीलंका संघाने भारताला पाच विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. दुसरीकडे, जानेवारी 2020मध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघाला 78 धावांनी पराभूत करत हिशोब बरोबर केला होता.

चला तर भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात…

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना केव्हा खेळला जाईल?
भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना गुरुवारी (दि. 05 जानेवारी) खेळला जाईल.

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) येथे खेळला जाईल.

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना केव्हा सुरू होईल?
भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी 6.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होईल?
भारत आणि श्रीलंका संघातील टी20 आणि वनडे मालिकेचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषांमध्येही समालोचनासह हे सामने पाहता येतील.

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना फोन किंवा लॅपटॉपवर कसा पाहता येईल?
भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार ऍपवर पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना मोफत कुठे पाहता येईल?
भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. डीडी स्पोर्ट्सवर फक्त डीडी फ्री डिशवर हा सामना लाईव्ह पाहता येईल.

टी20 मालिकेसाठीचे दोन्ही संघ
भारत-
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

श्रीलंका-
पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दसून शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, लाहिरू कुमारा, अविष्का फर्नांडो, अशेन बंदारा, प्रमोद मदुशन, दुनिथ वेललागे, नुवान तुषारा, सदीरा समरविक्रमा. (india vs sri lanka 2nd t20 match know live streaming telecast channel and where how to watch match )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूला स्वत:च्या मायदेशातच ‘धोका?’, पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावर पेटला वाद
पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडली गेली अभिनेत्री मंदिरा बेदी, आयपीएलच्या ‘या’ संघासोबत केली हातमिळवणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---