Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे टी20 आधी टीम इंडिया अडचणीत! महत्त्वाचा फलंदाज झाला जायबंदी; त्रिपाठीला मिळणार संधी?

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hooda, Mavi, Axar, Hardik & Suryakumar

Photo Courtesy: Twitter/BCCI


मंगळवारी (दि. 03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 2 धावांनी आपल्या नावावर केला.  हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर येतेय. संघाचा प्रमुख फलंदाज संजू सॅमसन हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुणे येथे संघासोबत गेलेला नाही.

मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून वर्षाचा व मालिकेचा विजयाने प्रारंभ केला. त्यानंतर पुणे येथील सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. मात्र, या आधी संजू सॅमसन याच्या दुखापतीने उचल खाल्ली आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, सूज आल्याने तो भारतीय संघासह पुणे येथे पोहोचला नाही. मुंबईत राहूनच तो या दुखापतीवर उपचार घेईल.

बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळालेल्या संजूला या सामन्यात फलंदाजीत चमक दाखवता आली नव्हती. तो केवळ पाच धावा करून बाद झालेला. तसेच, पहिल्याच षटकात त्याने झेल सोडला होता. त्यानंतर 17 व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना मैदानात पाय फसल्याने त्याला ही दुखापत झाली. संजू या सामन्यात न खेळल्यास त्याच्या जागी पुणेकर असलेल्या राहुल त्रिपाठी याला घरच्या मैदानावर पदार्पणाची संधी मिळू शकते.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-

ईशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, युझवेंद्र चहल व अर्शदीप सिंग.

(Sanju Samson is doubtful for the 2nd Pune T20, he has stayed back in Mumbai for scans on his knee)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना
रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून


Next Post
Hardik-Pandya-And-Dasun-Shanaka

तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून

Yuzvendra-Chahal-And-Ruturaj-Gaikwad

आधीच संघातून बाहेर असणाऱ्या 'या' खेळाडूला चहलने डिवचले, व्हिडिओत कैद झाली घटना

Cristiano-Ronaldo-And-Rohit-Sharma

रोनाल्डो वर्षाकाठी कमावणार 1800 कोटी, भारताच्या सर्वात महागड्या खेळाडूला हा आकडा गाठायला लागतील 150 वर्षे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143