भारतीय संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करताना दिसत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंका संघाविरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. आता भारतीय संघाचा दुसरा टी20 सामना गुरुवारी (दि. 05 जानेवारी) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पुणे येथे पोहोचला आहे. यादरम्यानचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओत युझवेंद्र चहल याने प्लेइंग इलेव्हमध्ये सामील नसलेल्या खेळाडूशी केलेले कृत्य कैद झाले आहे.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कर्णधार हार्दिक पंड्या, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याव्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूही दिसत आहेत. हे सर्व खेळाडू बसमधून उतरून हॉटेलमध्ये जात आहेत. कर्णधार पंड्या आणि प्रशिक्षक द्रविड आपसात काहीतरी बोलताना दिसत आहेत. तसेच, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि ऋतुराज गायकवाड (Yuzvendra Chahal And Ruturaj Gaikwad) तसेच ईशान किशन हे खेळाडूदेखील क्रिकेट किटसोबत दिसत आहेत.
ऋतुराजला गुदगुल्या करताना दिसला चहल
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा त्याचा संघसहकारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला डिवचताना दिसत आहे. जेव्हा ऋतुराज पुढे जात असतो, तेव्हा चहल पाठीमागून येऊन त्याला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो. चहलच्या हाताचा स्पर्श होताच ऋतुराज अस्वस्थ होतो. तो कोणत्याही प्रकारची रिऍक्शन देत नाही. पहिल्या टी20 सामन्यात हार्दिकने ऋतुराजला प्लेइंग 11मध्ये संधी दिली नव्हती. ईशान किशनने सलामीला फलंदाजी करताना 37 धावांचे योगदान दिले होते.
वानखेडेत भारताचा विजय
टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 2 धावांनी श्रीलंका संघाला धूळ चारली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला सर्वबाद 160 धावाच करता आल्या होत्या. यावेळी भारताकडून पदार्पणवीर शिवम मावी याने 22 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. सामनावीर ठरलेल्या दीपक हुड्डा याने 23 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार खेचत 41 धावांची नाबाद खेळी साकारली होती. (indian cricket team arrived at pune for 2nd t20i ind vs sl yuzvendra chahal video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून
पाकिस्तानी खेळाडूला स्वत:च्या मायदेशातच ‘धोका?’, पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावर पेटला वाद