दिल्ली। शनिवारी देवधर ट्रॉफी 2018 चे विजेतेपद भारत ‘क’ संघाने पटकावले. त्यांनी हे विजेतेपद भारत ‘ब’ संघाचा 29 धावांनी पराभव करत मिळवले आहे. भारत ‘क’ च्या या विजयात अजिंक्य रहाणे आणि इशान किशन यांनी शतक करत मोलाचा वाटा उचलला.
पण या सामन्यात एक मजेदार गोष्ट पहायला मिळाली. भारत ‘क’ प्रथम फलंदाजी करत असताना 37 व्या षटरकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने लॉन्गऑनला फटका मारला आणि एक धाव काढली. या एक धावेबरोबर रहाणेला वाटले की त्याचे शतक पूर्ण झाले.
त्यामुळे त्याने बॅट उंचावून शतक साजरे करण्यास सुरुवात केली. पण यावेळी समोलोचकांनी सांगितले की अजून रहाणेला शतक करण्यासाठी आणखी 3 धावांची गरज आहे. याच कारणामुळे ड्रेसिंगरुममध्ये असणाऱ्या सुरेश रैनाने रहाणेला हातवारे करत शतकासाठी अजून 3 धावा बाकी असल्याचे सांगितले. या गोष्टीवर रहाणेलाही हसू आवरले नाही.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
What happened there? 😁 😆 @ajinkyarahane88 felt he got to a 100, @ImRaina was quick to rectify there were 3 more runs to go 😄 pic.twitter.com/qi5RaMF8t8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 27, 2018
या सामन्यात रहाणेने नाबाद 144 धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज इशान किशननेही 87 चेंडूत 114 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज
–कर्णधार म्हणूनही विराट कोहली ठरला हिट; केला हा मोठा पराक्रम
–कुमार संगकाराच्या या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका