आयपीएल २०२२मधील ३४व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभूत केले. या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने तुफानी शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सामन्याअंती रिषभ पंत हा चर्चेचा विषय ठरला. सामन्यातील शेवटच्या षटकादरम्यान नो बॉलवरून विवाद झाला, ज्याला दिल्लीचा कर्णधार पंत सहन करू शकला नाही आणि तो आपल्या फलंदाजांना मैदानावरून बाहेर बोलताना दिसला. या प्रसंगामुळे सामनाही बराच वेळ थांबवावा लागला.
मैदानी पंचांनी नो बॉलचा (No Ball Controversy) निर्णय न देणे आणि वातावरण तापल्यानंतरही हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे न सोपवणे, या प्रकरणामुळे पंतबरोबरच (Rishabh Pant) वानखेडे स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेले दर्शकही पंचांवर हताश झाले. याच नाराज झालेल्या दर्शकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मैदानी पंच नितीन मेनन (Nitin Menon) यांनी दिल्लीच्या शेवटच्या षटकात नो बॉल न दिल्यामुळे सामना पाहायला आलेले दर्शक रागावलेले दिसले. त्यांनी मिळून पंचांना उद्देशून चीटर-चीटर असे नारेबाजी (Crowd Chants Cheater Cheater) केली. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/superking1814/status/1517568490403553280?s=20&t=IQYwvrTr9GVhP6XNBnad4Q
नक्की काय घडले शेवटच्या षटकात?
विजयासाठी शेवटच्या षटकात दिल्लीला ३६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानचा ओबेद मॅककॉय गोलंदाजीसाठी आला, तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोवमन पॉवेल होता. षटकातील सुरुवातीचे तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकले आणि संघाला विजयाची आशा निर्माण झाली. यादरम्यान मॅककॉयने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूमुळे हा वाद झाला. त्याने हा चेंडू फुलटॉस घेकला होता आणि तो नो बॉल असू शकत होता. परंतु पंचाने त्याला नो बॉल करार दिला नाही. याच कारणास्तव कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच संतापला आणि त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला.
दिल्लीच्या (Delhi Capitals) डग आऊटमधून नो बॉलची मागणी केली जात होती, पण पंचांनी तिसऱ्या पंचाकडे विचारणा न करता निर्णय दिला. त्यावेळी जोस बटलर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने पंतला समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, दिल्लीचा प्रशिक्षक शेन वॉटसनने देखील पंतला समज दिली. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक प्रवीण आमरे मैदानात धावत गेले आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पॉवेल सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या वादानंतरच्या तीन चेंडूवर त्याला कमाल करता आली नाही. शेवटच्या तीन चेंडूवर त्याने अवघ्या २ धावा केल्या. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नो बॉल विवादावरून प्रशिक्षक वॉटसनचा दिल्ली संघालाच घरचा आहेर; म्हणाला, ‘हे स्विकाहार्य नाही’
DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर
डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून