---Advertisement---

ज्या मैदानावर त्याने रुबाब दाखवला, त्याच मैदानावर झाली त्याच्या जीवनाची अखेर

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 9:06 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि जगप्रसिद्ध समालोचक डिन जोन्स यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत हृदयविकाराच्या त्रीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांनतर त्यांना बुधवारी(७ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) एका खासगी कार्यक्रमात कुटुंबातील सदस्यांनी भावनिक होत ‘अंतिम निरोप’ दिला.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे , डीन जोन्स यांची पत्नी जेन, दोन्ही मुली आणि कुटुंबातील सदस्यांसह केवळ 10 लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. जोन्सची शवपेटी एमसीजी येथे नेण्यात आले, त्यांनी या मैदानावर त्याच्या कारकिर्दीतल्या 52 कसोटी सामन्यांपैकी 6 कसोटी सामने खेळले होते. तसेच 41 आंतरराष्ट्रीय सामने खेळले या मैदानात त्यांनी खेळले होते. हे त्यांचे घरचे मैदान होते. त्यामुळे त्यांना अंतिम निरोपही या मैदानातूनच दिला गेला.

याप्रसंगी जोन्सची पत्नी जेन म्हणाली, “गेल्या आठवड्यातभरात जोन्सबद्दल लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेली आहे.”

https://twitter.com/CricketAus/status/1313725101670453253?s=20

 

डिनो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने 52 कसोटी आणि 164 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. डीन जोन्सची गणना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 216 होती आणि वनडेत 145 ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. ते खेळपट्टीवर वेगवान धाव घ्यायचे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या, ज्यामध्ये 11 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे सामन्यात जोन्स यांनी 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या, ज्यामध्ये सात शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.

जोन्स यांनी 245 प्रथम श्रेणी सामन्यांत 19188 धावा केल्या. 324 ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतके ठोकली होती, 1986 मध्ये त्याने चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे भारताविरुद्ध 210 धावांची खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---