---Advertisement---

दिल्लीचा मास्टरस्ट्रोक, डेविड मिलरला थांबवत ट्रिस्टन स्टब्सला पाठवले फलंदाजीला

On: गुरूवार, एप्रिल 2, 2026 7:40 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (१ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना खेळला गेला. यामध्ये डगआऊटमध्ये घेतलेले निर्णय सामन्याचा निकाल कसा पालटतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. हा सामना दिल्लीने जिंकला आणि लखनऊविरुद्ध सलग पाचवा सामना जिंकण्याची कामगिरी केली.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीला १४२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, दिल्लीची स्थिती एकावेळी ४ विकेट्सवर २६ धावा अशी होती. त्यामुळे दिल्ली हरतो की काय असे वाटत असताना दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी घेतलेला निर्णयामुळे संघ विजयी ठरला. कर्णधार अक्षर पटेल शून्यावर बाद झाल्यानंतर डेविड मिलर फलंदाजीसाठी सज्ज होता. तेवढ्यात बदानी धावत डगआऊटमध्ये आले आणि मिलरला रोखले.

बदानी यांनी मिलरच्याजागी ट्रिस्टन स्टब्सला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे सामन्यात काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. स्टब्स फलंदाजीला आल्यानंतर दिल्लीने एकही विकेट गमावली नाही आणि १७.१ षटकात लक्ष्य सहज पार केले. स्टब्सने आपल्या संयमी खेळीने संघाला सावरले. त्याने ३२ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला. त्याने समीर रिझवीला चांगली साथ दिली. रिझवी ४७ चेंडूत ७० धावा करत नाबाद राहिला. बदानी यांचा डगआऊटमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की सामने केवळ मैदानावरच नाही, तर डगआऊटमध्ये घेतलेल्या निर्णयांनीही जिंकले जातात. पत्रकार परिषदेत अनेकदा शांत दिसणाऱ्या बदानी यांनी आपली रणनीती सांगितली. दिल्लीने अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही, मात्र अशा निर्णयामुळे ते या हंगामात चांगल्या तयारीने उतरले असल्याचे दिसते. दिल्लीचा पुढील सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध ४ एप्रिलला आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---