अहमदाबाद । जगातील सर्वात मोेठे स्टेडियम अशी ओळख मिळवलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी आपापल्या संघातील खेळाडूंची ओळख करुन दिली.
राष्ट्रपतींच्या हस्ते झाले स्टेडियमचे उद्घाटन
भारत-इंग्लंड संघात सुरु झालेला तिसरा कसोटी सामना पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होत आहे. त्यामुळे हा सामना सुरु होण्याआधी या पुर्नबांधणी केलेल्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडामंत्री किरण रिजिजू, गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रपतींनी घेतली दोन्ही संघांची भेट
उद्घाटन सोहळ आटोपल्यानंतर राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपल्या संघातील खेळाडूंची ओळख त्यांना करुन दिली. तसेच हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा १०० वा कसोटी सामना आहे. यानिमित्ताने त्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
.@ImIshant was felicitated by the Honourable President of India Shri Ram Nath Kovind & Honourable Home Minister of India Shri Amit Shah before the start of play here in Ahmedabad.@rashtrapatibhvn @AmitShah pic.twitter.com/7elMWDa9ye
— BCCI (@BCCI) February 24, 2021
मोटेरा स्टेडियम आणि नरेंद्र मोदी स्टेडियम
या स्टेडियमच्या उद्घाटनावेळी या स्टेडियमचे नावही बदलण्यात आले. या स्टेडियमचे नवीन नाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ठेवण्यात आले आहे. असे असले तरी या स्टेडियममधील अन्य सुविधांचा भाग हा सरदार पटेल एन्क्लेव्ह या नावानेच ओळखला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –