मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू असल्याकारणाने सर्व क्रिकेटपटू आपल्या फॅमिलीसोबत वेळ देत आहेत तर काही क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. या माध्यमातून ते क्रिकेट फॅन्सबरोबर संपर्कात आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो.
लॉकडाउन असल्याकारणाने शमी आपल्या घरामध्येच फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचा हा व्हिडिओ क्रिकेट फॅन्सला खूप आवडल्याने त्याची फलंदाजी पाहून सारेजण कौतुक करत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण याने हा देखील मोहम्मद शमीची फलंदाजी पाहून अचंबित झाला.
इरफान पठाण कमेंट्समध्ये गोलंदाजी कोण करत आहे असे विचारल्यावर मोहम्मद शमीने एम.डी. कैफ छोटा भाऊ असे उत्तर दिले. मैदानात ज्याप्रमाणे फलंदाजी करतो अगदी त्याच स्टाईलने मोहम्मद शमी आपल्या घरात फलंदाजीचा सराव करत आहे. क्रिकेट फॅन्सला हा व्हिडिओ आवडला असून अनेक जण त्याच्यावर कमेंट्स करत आहेत.
Tell me the rules of Indoor Cricket! 😅 #OneDropOneHand pic.twitter.com/ad7MzgwQj1
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) May 29, 2020
Md Kaif chota bhai
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) May 29, 2020
या व्हिडीओबाबत एका यूजरने लिहिले की, अशी फलंदाजी पाहून आपले सलामीचे फलंदाज तणावात येतील. दुसऱ्या युजरने लिहिले की शमी भाई तुम्ही डिफेन्स चांगले करता. तुमचा लाँग शॉट आजही आम्हाला आठवतो. आदित्य नावाच्या युजरने लिहिले की, शमीला बॅटिंगमध्ये प्रमोशन मिळणार आहे. अतुल नावाच्या युजरने भारतीय संघाला आणखी एक फलंदाज मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली.