---Advertisement---

पप्पाची परी! सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफला मुलीने शिट्टी वाजवत केले चीयर, पाहा क्यूट व्हिडिओ

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 1:29 PM
---Advertisement---

सोमवारी (४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्स राखून चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. दिल्ली आणि चेन्नईच्या सामन्यादरम्यान काही प्रसंग असे पाहायला मिळाले, ज्या प्रसंगांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये एमएस धोनीची मुलगी स्टॅन्ड्समध्ये बसून चेन्नईच्या विजयासाठी प्रर्थना करताना दिसली. तर दुसरीकडे सलामीवीर फाफ डू प्लेसिसची मुलगी तो क्षेत्ररक्षण करताना त्याच्यासाठी शिट्टी वाजवताना दिसली आहे.

फाफच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. फाफची मुलगी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आली होती. व्हिडिओत दिसत आहे की, फाफ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा आहे. अशात स्टॅन्ड्समधून सामन्याचा आनंद घेणारी त्याची गोंडस मुलगी त्याचे प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. फाफची लहान मुलगी तिच्या वडिलांसाठी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर वेगवेळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी या व्हिडिओला बेस्ट व्हिडिओ म्हटले आहे.

दरम्यान, आयपीएल २०२१ मध्ये फाफचे प्रदर्शन बऱ्यापैकी समाधानकारक राहिले आहे. त्याने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ४७० धावा केल्या आहेत. या धावांमध्ये त्याच्या ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. चालू हंगामात फाफने अनेकदा सीएसकेसाठी विजयात महत्वाचे योगदान दिले आहे.

आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधित धावा करणाऱ्यांचा विचार केला तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. त्याने १२ सामन्यात ५२८ धावा केल्या आहेत. तसेच आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने १२ सामन्यांमध्ये ४०७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

युएईत ईशानचा बोलबाला! रोहित-सूर्याला मागे टाकत केला नवा पराक्रम

प्ले ऑफचे टेंशन विसरून ‘या’ संघाचे खेळाडू करतायेत ‘पाणीवाला डान्स’; पाहा मजेदार व्हिडिओ

ईशान फिनीशेस ऑफ इन स्टाईल! आयपीएल २०२१ मध्ये ‘या’ धुरंधरांनी षटकार मारुन जिंकवलाय सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---