भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सातत्याने विविध कारणाने चर्चेत येत राहातो. त्याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. दरम्यान, त्याला मिळालेल्या यशामुळे त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेमही मिळाले. मात्र, नुकताच एका चाहत्याबरोबर केलेल्या एका कृतीमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
हार्दिकवर होतेय टीका
झाले असे की, सध्या हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, हार्दिक चाहत्यांच्या गराड्यात अडकला आहे. यावेळी चाहते त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हार्दिकही त्यांना सेल्फी घेऊ देत आहे. पण, याचदरम्यान एका चाहत्याने त्याच्या खांद्यावर हात हात ठेवून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकला ही गोष्ट आवडली नसल्याने, त्याने चाहत्याचा हात खांद्यावरून बाजूला केला. (video of Hardik’s behaviour has gone viral)
https://www.instagram.com/p/CX2z4d2o9Bi/
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अनेकांनी हार्दिकमध्ये ऍटिट्यूड असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हार्दिकचे चाहत्याबरोबर वागणे चूकीचे असल्याचे म्हटले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हार्दिक जुने दिवस विसरला, असे म्हटले, तर काहींनी असा कयास लावला आहे की, हार्दिकने कोविड-१९ च्या नियमांमुळे असे केले असावे.
हार्दिक सध्या भारतीय संघाबाहेर
हार्दिक २०२१ टी२० विश्वचषकात अखेरचा खेळला होता. त्यांनतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. गेल्या २ वर्षापासून हार्दिक त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसत आहे. तसेच २०१९ साली पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला गोलंदाजीही करताना त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचमुळे त्याच्या भारतीय संघातील अष्टपैलू भूमीकेबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी हार्दिकने विजय हजारे ट्रॉफीमधूनही नाव मागे घेतले होते. त्याने पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याठी बडोदा संघातून नाव मागे घेतल्याचे सांगितले होते. पण, त्याचा भाऊ कृणाल पंड्या ही स्पर्धा खेळला होता.
अधिक वाचा – हार्दिक पंड्या पुन्हा बनणार बाप? पत्नी नताशाच्या ‘या’ फोटोंनी चर्चांना उधाण
हार्दिकने आत्तापर्यंत ११ कसोटी, ६३ वनडे आणि ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ५३२ धावा आणि १७ विकेट्स घेतल्यात. त्याचबरोबर वनडेत त्याने १२८६ धावा केल्या असून ५७ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हार्दिकने ५५३ धावा आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅट हातात घेण्याआधीच विराटने केला ‘महापराक्रम’! ठरला ‘या’ बाबतीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
हिमाचल प्रदेशने रचला इतिहास! तमिळनाडूला पराभूत करत जिंकली विजय हजारे ट्रॉफी
विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद
व्हिडिओ पाहा – आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने