वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने १ धावेने विजय मिळवला होता. हा सामना होऊन एक दिवस उलटून गेला तरी देखील या सामन्यात कागिसो रबाडा याने टाकलेला चेंडू सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाने केल्या १६७ धावा
या मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकने ७२ धावांची खेळी तुफानी खेळी केली होती. तर वान डर दुसेनने ३२ धावांचे योगदान दिले होते. वेस्ट इंडीज संघाकडून ओबेड मेक्कॉयने २२ धावा देत ४ गडी बाद केले होते. दक्षिण आफ्रिकन संघाला २० षटकअखेर ८ बाद १६७ धावा करण्यात यश आले होते. (Video of kagiso rabada dismissing Kieron Pollard goes viral on social media)
रबाडाने टाकलेला चेंडू होतोय व्हायरल
वेस्ट इंडिज संघाकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एविन लुईस आणि लेंडल सिमंस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु त्यांना मोठी खेळी करण्यास अपयश आले होते. लुईसने २७ धावांची खेळी केली. तसेच विस्फोटक फलंदाज आंद्रे रसलने २५ धावांची योगदान दिले होते.
वेस्ट इंडिज संघातील फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना, कर्णधार कायरन पोलार्डवर सामना जिंकून देण्याची जबाबदारी होती. परंतु १३ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कगिसो रबाडाने असा काही अचूक यॉर्कर चेंडू टाकला, जो पोलार्डचे लक्ष विचलित करत यष्टी उधळून निघून गेला. कुठल्याही वेगवान गोलंदाजासाठी हा चेंडू एक आदर्श यॉर्कर चेंडू असेल.
https://youtu.be/FeYO4aWxwqo
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना
पोलार्ड बाद झाल्यानंतर फेबियन ॲलेनने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचत नेला. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती. तसेच शेवटच्या चेंडूवर ८ धावांची आवश्यकता असताना फेबियन ॲलेनने खणखणीत षटकार लगावला होता. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा अवघ्या १ धावेमुळे पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात घडला होता गंभीर-आफ्रिदीत हाय व्होल्टेज ड्रामा; वाचा किस्सा
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडविरुद्ध असणार रोहितचा सलामी जोडीदार!