---Advertisement---

धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, पत्नीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

On: शुक्रवार, मे 7, 2021 11:06 AM
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून एमएस धोनी आयपीएलमुळे चर्चेत होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामात चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. तरीदेखील एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. यामागचे कारण म्हणजे, त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, एमएस धोनीला बाईकचा किती नाद आहे. तसेच त्याच्या घरी पाळीव कुत्रा देखील आहे. अनेकदा त्याचे कुत्र्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु आता त्याचा घरी एका घोड्याचे आगमन झाले आहे. या बाबतची माहिती त्याची पत्नी साक्षी सिंग धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे.

साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक काळया रंगाचा घोडा दिसून येत आहे. त्याच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील दिसून येत आहे. दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत आहेत. या दोघांच्या मस्तीचा नेटकरिही चांगलाच आनंद घेताना दिसून येत आहेत.

साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लिहिले आहे की, “घरात तुमचे स्वागत आहे चेतक. जेव्हा तुम्ही लीलीला (पाळीव कुत्रा) भेटलात तेव्हा तुम्ही एका जेंटलमनसारखे वागलात. तुमचे आमच्या कुटुंबात स्वागत आहे.” या व्हिडिओला ४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ :

https://www.instagram.com/reel/COVNLLGn43H/?igshid=1vo0pg88tg43q

https://www.instagram.com/reel/COVTWfrH74y/?igshid=16kzcpau62yfz

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामात ७ सामने खेळले होते. यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता आयपीएल स्पर्धा स्थगित असल्यामुळे धोनीला देखील आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१: किती ते दुर्देव! तब्बल सात वर्षांनंतर मिळाला खरेदीदार, परंतु पूर्णवेळ बसून राहिला बाकावर

मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डला मिळाली खुशखबर, ‘किंग खान’च्या संघाच्या नेतृत्त्वपदी झाली निवड

लेकीची वेडी माया! ‘बाबा सुपरमॅनसारखा लढ आणि लवकर बरा हो’, कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना लेकीचा भावुक संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---