---Advertisement---

‘एक रुपयाची पेप्सी, श्रेयस भाऊ सेक्सी’; चाहत्यांच्या नारेबाजीचा प्रेमळ व्हिडिओ अय्यरने दिले पुनरागमनाचे संकेत

On: बुधवार, मे 12, 2021 2:37 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. इतकेच नव्हे तर त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली होती. श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्वपद युवा रिषभ पंतच्या हातात देण्यात आले होते.

क्रिकेटपासून इतके दिवस दूर असणाऱ्या श्रेयस अय्यरला भारतीय संघात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे. त्याने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने या आयपीएल हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु या स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली. श्रेयस अय्यर जर फिट असेल तर तो आगामी श्रीलंका दौऱ्यावर संघात स्थान मिळवू शकतो. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर, इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे. या संघात अय्यरला संधी मिळालेली नाही. परंतु जुलै महिन्यातील श्रीलंका दौऱ्यावर त्याची निवड केली जाऊ शकते.

अय्यरने शेअर केलेला जुना व्हिडिओ ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील आहे. यामध्ये तो सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दिसून येत आहे. तसेच व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट चाहते त्याला चीयर करताना दिसून येत आहेत. ते म्हणत आहेत की, ‘एक रुपयाची पेप्सी, श्रेयस भाई सेक्सी.’

या व्हिडिओला त्याने कॅप्शन देत लिहिले की, ‘मला माझा आवाज ऐकू आला.’ त्यापुढे त्याने लिहिले की, ‘मी मैदानावर येण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.’

 

भारतीय क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात सामना असला, तरीही आवर्जून हजेरी लावत असतात. जेव्हा खेळाडू मैदानावर असतो तेव्हा प्रेक्षक त्याचे नाव घेऊन त्याला समर्थन करत असतात. एखादा खेळाडू फलंदाजी करत असेल, क्षेत्ररक्षण करत असेल किंवा गोलंदाजी करत असेल. जेव्हा जेव्हा प्रेक्षक त्याचे नाव घेतात; तेव्हा त्याचा उत्साह आणखी वाढत जातो. अनेकदा खेळाडू चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचा उल्लेख करत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भावा पँट तरी घालायची’ म्हणत मुंबईच्या सलामीवीराने कार्तिकला केले ट्रोल, मग त्यानेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर

टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज

कसोटी चॅम्पियनशीप: विराट वगळता भारताचे इतर फलंदाज इंग्लंडमध्ये ठरलेत फेल! रोहितच्या नावे फक्त ३४ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---