हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. गुजरातने चेन्नई सुपर किंग्स संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयासाठी राशिद खान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळी समालोचक रवी शास्त्री यांच्याकडून मोठी चूक झाली. त्यांनी यावेळी कर्णधार हार्दिक पंड्या याला गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार म्हटले. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने शुबमन गिल (63) याच्या अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकात 5 विकेट्स गमावत 182 धावा ठोकून पूर्ण केले.
ऋतुराजचे अर्धशतक
चेन्नईकडून फलंदाजी करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावा ठोकल्या होत्या. त्याने यादरम्यान 4 चौकार आणि 9 षटकारांचीही बरसात केली होती. त्याच्याव्यतिरिक्त मोईन अली (23) यालाच 20 धावांचा आकडा पार करता आला. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने 26, मोहम्मद शमीने 29 आणि अल्झारी जोसेफ याने 33 धावा खर्च करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएल 2023 स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यापूर्वी शानदार ओपनिंग सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अरिजित सिंग (Arijit Singh), तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी शानदार प्रदर्शन केले. यानंतर नाणेफेकीसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि एमएस धोनी (MS Dhoni) मैदानावर आले. यावेळी एक मजेशीर घटना पाहायला मिळाली.
नाणेफेकीवेळी शास्त्रींचा गोंधळ
नाणेफेकीवेळी रवी शास्त्री (Ravi Shastri) गोंधळल्याचे दिसले. त्यांनी यावेळी चुकून हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्सऐवजी गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार म्हटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शास्त्रींच्या या चुकीवर हार्दिकही हसताना दिसला.
🚨 Toss Update🚨@gujarat_titans win the toss and opt to field first against @ChennaiIPL at the Narendra Modi Stadium in Ahmedabad 🏟️
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/F2KNPMuHTy
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
खरं तर, गुजरात जायंट्स हा संघ आयपीएल 2023मधील नसून महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) स्पर्धेतील आहे. मागील महिन्यातच 26 मार्च रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेचे पहिला-वहिला किताब आपल्या नावावर केला होता. (video viral ravi shastri calls hardik pandya captain of gujarat giants ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंड्यालाही भरली पुणेकर ऋतुराजची धडकी; विजयानंतर म्हणाला, ‘असं वाटत होतं आम्ही त्याला…’
केन विलियम्सनची दुखापत गंभीर, पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का