अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी पावसामुळे व्यत्यय येत आहे.
आजच्या दिवसाच्या खेळालाही पावसामुळे उशीरा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भारताने आॅस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर पहिल्या सत्रात संपुष्टात आणला. त्यामुळे भारताने 15 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सत्रात लक्ष वेधून घेतले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीने.
त्याने स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळे तो डान्स करण्यात मग्न असताना कॅमेरामनने त्याला अचूक टिपले आहे. याचा व्हिडिओ cricket.com.au या आॅस्ट्रेलियाच्या ट्विटर हँडेलवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.
Virat's loving it… #AUSvIND pic.twitter.com/JV0lxo4Aen
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2018
या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ट्रेविस हेडने सर्वाधिक 72 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले
–पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत